मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सध्या लोकप्रिय मानला जाणारा आयपीएल क्रिकेट खेळ सुरू आहे, मात्र हा खेळ सट्टाबाजीने मोठा चर्चेत आला आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ व हयात नगर येथे या खेळावर सट्टा लावणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
औंढा नागनाथ पोलीस ठाणे अंतर्गत औंढा नागनाथ शहरातील बोबाडे गल्लीत काही युवक आयपीएल क्रिकेट सट्टा चालवीत आहेत अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. यामध्ये सचिन ग्यानबाराव उदगीरे (रा. सुतार गल्ली), प्रदीप सखाराम गोबाडे (रा. गोबाडे गल्ली), सतीश प्रभाकर सोनुने मारुती उर्फ ओम राजकुमार सोनुने दोघे (रा. सुतार गल्ली, औंढा नागनाथ) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये सीआयइएक्स या ॲपवर दिलेल्या भावाप्रमाणे लोकांकडून पैसे घेऊन आयपीएल सट्टा चालवीत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे पोलिसांनी या चारही व्यक्तींकडे चार मोबाईल, दोन मोटार सायकल व नगदी 5 हजार 230 रुपये असा एकूण एक लाख 76 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या आरोपी विरुद्ध पोलीस अधिकारी शिवसांब घेवारे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या कारवाहीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत तालुक्यातील हयातनगर येथे आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळल्या जात असल्याच्या माहिती भरून छापा टाकला.
यामध्ये लोमेश देवेंद्र वैद्य (रा. हयातनगर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये लाईन गुरु ॲपच्या आधारे पैशाचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेऊन आयपीएल सट्टा चालवीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी नमूद व्यक्तीच्या ताब्यातून एक मोबाईल व नगदी चार हजार 200 रुपये असा एकूण 16 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या आरोपी विरुद्ध पोलीस अंमलदार राजूसिंग ठाकूर यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलीस ठाण्यात कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भगवान आडे, विठ्ठल काळे, आकाश टापरे, गजानन पोकळे, गणेश लेकुळे, लिंबाजी वाबळे, ज्ञानेश्वर पायघन, प्रशांत वाघमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.