Marmik
Hingoli live

सुलदली येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / सतीश खिल्लारी :-

सेनगाव – तालुक्यातील सुलदली येथे 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमा मोठा उत्साहाने साजरी करण्यात आली. सुजाता फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. तसेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच त्यांचे महानिर्वाण झाले होते.

सुजाता फाउंडेशन च्या वतीने सेनगाव तालुक्यातील सुलदली येथे 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, कवी शिवाजी कराळे, प्रकाश पाटील, शंकरराव गोरे, विष्णू कांबळे (नाशिक) तसेच सुजाता फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

हा कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच अबाल – वृद्ध उपस्थित होते.

Related posts

तोषनीवाल महाविद्यालयाकडून वसतिगृहाच्या नावावर विद्यापीठ अनुदान आयोगाची आणि सीबीएससी च्या नावाखाली पालकांची लूट

Gajanan Jogdand

उत्कृष्ट घरकुलाचे बांधकाम केल्याने रिधोरा येथील तिघांचा गौरव, साहित्य महागल्याने घरकुलाचा निधी वाढवून देण्याची गरज

Gajanan Jogdand

फिरत्या एक्स-रे मोबाईल व्हॅनद्वारे होणार टीबीवर तात्काळ उपचार

Santosh Awchar

Leave a Comment