मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका 18 मे रोजी घेण्यात आल्या. या निवडणुकांचे निकाल आज 19 मे रोजी लागला.
मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1958 चे कलम 10 (पोटकलम 1) या अधिनियमांन्वय तयार केलेले ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 च्या नियम 37 प्रमाणे मिळालेल्या अधिकारांवर हिंगोली जिल्हाधिकारी यांनी सेनगाव तालुक्यातील कारेगाव, साखरा, जवळा बुद्रुक, कापड सिंगी व हत्ता नाईक या गावातील पोटनिवडणूक 18 मे रोजी घेण्यात आली. या निवडणुकांचा निकाल आज 19 मे रोजी लागला.
यामध्ये कारेगाव ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 मधून अयोध्या शेषराव नाईकवाल (सर्वसाधारण), चंद्रभागा हिम्मतराव इंगोले (सर्वसाधारण स्त्री), कौशल्या भारत उबाळे (बिनविरोध) (अनुसूचित जाती स्त्री) व प्रभाग क्रमांक 2 मधून कमला विश्वनाथ गायकवाड (सर्वसाधारण) हे निवडून आले आहेत.
साखरा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 मधून अशोक धर्माजी चवरे (सर्वसाधारण) व प्रभाग क्रमांक 2 मधून रोशनी अशोक इंगळे (अनुसूचित जाती महिला), जवळा बुद्रुक ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 मधून शांताबाई प्रभाकर इंगोले (बिनविरोध) (सर्वसाधारण स्त्री) हे निवडून आले आहेत.
कापडसिंगी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 मधून राधाबाई गणेश साबळे (बिनविरोध) (अनुसूचित जमाती) तसेच हत्ता नाईक ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 मधून ममताजी धोंडोबा हिमगिरे (सर्वसाधारण) हे निवडून आले आहेत.
विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला