मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अथक परिश्रम घेऊन पोलीस भरतीत उत्तीर्ण झालेल्या ज्योती दोडगांवकर यांचा मार्मिक महाराष्ट्र समूहाच्या वतीने मुख्य संपादक गजानन जोगदंड व मुख्य व्यवस्थापक संतोष अवचार यांनी पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार करण्यात आला.
हिंगोली तालुक्यातील दिग्रस कराळे येथील मातंग समाजातील ज्योती यांचे लहानपणापासून पोलीस होण्याचे स्वप्न होते. त्यांचा विवाह सारंग दोडगावकर यांच्या समवेत झाला; मात्र विवाह नंतरही त्यांनी पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे सोडले नाही. दोन वर्षाच्या सिद्धी या चिमुकलीचा सांभाळ करत अथक परिश्रम घेऊन ज्योती यांनी हे यश प्राप्त केले आहे.
ज्योती यांनी या स्वप्नाचा जणू पाठलागच केला होता! लहानपणापासून काहीतरी शिक्षण घेऊन काहीतरी मोठे बनण्याचे स्वप्न घेऊन त्याचा पाठलाग करणारे व्यक्ती समाजात क्वचित आढळतात. यामध्ये ज्योती यांचे नाव पहिले घ्यावे लागेल.
या यशात त्यांचे पती सारंग दोडगांवकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी नेहमी ज्योती यांना प्रोत्साहन देत पोलीस भरतीसाठी सराव आणि अभ्यास परावर्त केले. या दोघांच्याही प्रयत्नांना नियतीने यश मिळवून दिले.
ज्योती या महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ज्योती यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा सांभाळत पोलीस भरती देऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.
यामुळे त्यांचा मार्मिक महाराष्ट्र समूहाच्या वतीने मुख्य संपादक गजानन जोगदंड व मुख्य व्यवस्थापक संतोष अवचार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व हार घालून ज्योती सारंग दोडगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबई येथील प्रख्यात एलआयसी मार्गदर्शक संतोष आठवले यांच्यासह दोडगावकर परिवार उपस्थित होता.