मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील मातंग समाजातील महाराष्ट्र शासन सेवेत लागलेल्या नवनियुक्त उमेदवारांचा सकल मातंग समाज हिंगोली च्या वतीने उद्या 21 मे रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे जाहीर सत्कार केला जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडून नुकतेच विविध विभागातील पदभरती करण्यात आली. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाजातील युवक – युवतींनी नेत्र दीपक यश प्राप्त केले आहे.
यामध्ये आरबीआय बँकेमध्ये व्यवस्थापक म्हणून लागलेले अजय गायकवाड, मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर म्हणून लागलेली कोमल कांबळे, महाराष्ट्र पोलीस दलात लागलेल्या ज्योती मानवतकर – वाहुळे, प्रदीप पाटोळे, मनोहर कांबळे, ज्ञानेश्वर जोगदंड, विलास शिखरे, शरद कांबळे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासन सेवेत लागलेल्या या नवनियुक्त उमेदवारांचा सकल मातंग समाज हिंगोली तर्फे 21 मे रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे जाहीर सत्कार केला जाणार आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मातंग समाज बांधवांनी तसेच नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मातंग समाज हिंगोली च्या वतीने करण्यात आले आहे.