मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-
हिंगोली – महाराष्ट्र शासन सेवेत लागलेले हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाजातील नूतन उमेदवारांचा व त्यांच्या पालकांचा हिंगोली येथील सकल मातंग समाजाच्या वतीने 21 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यास शिक्षण आणि नोकरीसाठी ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या उपक्रमांतर्गत अर्थसाह्य करण्याचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली येथील प्रसिद्ध छाती रोग तज्ञ हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल धुमाळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बबनराव शिखरे, प्रेमकुमार सोनुने, युवा उद्योजक हिंगोली भूषण पुरस्कार प्राप्त सचिन आठवले प्रदीप खंदारे हे उपस्थित होते.
महाराष्ट्रात नंबर दोन वर असलेल्या मातंग समाज हा आता कुठे संघटित होण्याच्या मार्गावर आहे. समाजातील बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून शिक्षणाचे प्रमाणही अत्यल्प आहे.
आर्थिक व सामाजिक परिस्थिती हालाखीची असल्याने अनेक मुला – मुलींना अर्ध्यावर शिक्षण सोडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पालकांना हातभार लावावा लागतो.
योग्यता असूनही या मुला – मुलींना आपली योग्यता त्यामुळे सिद्ध करता येत नाही. या मुला – मुलींचे शिक्षण हिंगोली येथील सकल मातंग समाजाच्या वतीने जिथे कमी तिथे आम्ही या उपक्रमांतर्गत करण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला.
तसेच समाजातील युवकांना रोजगार आणि केंद्रांनी राज्य शासनाच्या सेवा भरतीसाठी आवश्यक ती मदत करण्याचा निर्धारही या उपक्रमांतर्गत करण्यात आला.
यावेळी ज्ञानेश्वर सुनिल जोगदंड(पोलिस)ज्योती मानवतकर – वाहुळे (पोलिस), प्रदीप भाऊराव पाटोळे(पोलिस), मनोहर गणेश कांबळे(पोलिस), शरद शामराव कांबळे(पोलिस), कोमल सोनाजी कांबळे(steno), विलास शिखरे(पोलिस), अजय आत्माराम गायकवाड(assistant manager rbi), सुजाण पोष्टी वाघमारे (सहायक अभियंता श्रेणी२), अलका संजय गवळी, (पोलिस), सुनिल गायकवाड (लिपिक म.रा. प.महामंडळ औरंगाबाद विभाग) यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य व्यवस्थापक संतोष अवचार यांचाही मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल खंदारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्माराम गायकवाड हरिभाऊ सोनवणे मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य व्यवस्थापक संतोष अवचार, अनिल खंदारे, प्रेम कुमार सोनवणे, डॉ. रवि थोरात, सुमित कांबळे, संदीप गायकवाड, रवी कांबळे, दीपक गायकवाड, जय घोडे, अक्षय डाखोरे, आकाश सोनटक्के, प्रदीप खंदारे, नारायण सोनटक्के, सुशील कसबे, जालमीरे आदींनी परिश्रम घेतले.