मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – 28 मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात हिंगोली शहरात अनेक ठिकाणी मोठ मोठे झाडे उन्हाळून पडली तर काही ठिकाणी विद्युत खांबही वाकले. शहरातील आजम कॉलनी भागातील झमझम कॉलनी येथे वादळी वाऱ्याने वाकलेले विद्युत पोल सरळ करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे.
28 मे रोजी हिंगोली येथे दुपारी बेमोसमी पावसाचे वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
या पावसाने हिंगोली शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच काही ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि झाडेही महावितरण कंपनीच्या विद्युत खांब आणि तारांवर पडले. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या तर काही ठिकाणी विद्युत खांब वाकले.
हिंगोली शहरातील आझम कॉलनी भागातील शिवाजी महाविद्यालया जवळील झमझम कॉलनी येथे विद्युत खांब वाकला. तसेच डीपीत बिघाड झाला. यामुळे या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला.
महावितरण विभागाच्या हिंगोली कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता दिनकर पिसे आणि सहाय्यक अभियंत्या (शहर क्र. 2) चंदनखेडे यांनी दिलेल्या सूचनावरून महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी बोर्ड कर्मचारी विश्वनाथ बनसोडे, दीपक गडदे, दीपक घुगे हे युद्ध पातळीवर सदरील वाकलेला विद्युत खांब उभा करण्याचे काम करत आहेत.
सदरील विद्युत खांब विभाग करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली महावितरण कार्यालयाकडून करण्यात येत आहे.