Marmik
Hingoli live

विभागीय वन अधिकारी बी. एच. कोळगे सेवानिवृत्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील विभागीय वन अधिकारी (प्रभारी) बी.एच. कोळगे हे 31 मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयात सायंकाळी पार पडला.

हिंगोली येथील विभागीय पण अधिकारी प्रभारी बी.एच. बोळगे (सहाय्यक वनसंरक्षक) यांनी सलग 38 वर्षे 2 महिने अखंड शासकीय सेवा केली. 31 मे 2023 रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले. बुधवार 31 मे रोजी त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला.

यावेळी त्यांना सेवानिवृत्ती व पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुज्जर, नांदेड येथील उपवनसंरक्षक केशव वाबळे, सेवानिवृत्त सहाय्यक वन संरक्षक कामाजी पवार, परभणी येथील विभागीय अधिकारी जोशी, हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, औंढा नागनाथ वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडलिक होरे, सेनगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शेळके यांच्यासह सर्व वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच हिंगोली सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सहाय्यक वन संरक्षक बी. एच. कोळगे यांनी 18 जून 2021 पासून हिंगोली विभागीय वन अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला.

Related posts

मानव मुक्तीचे पहिले महानायक तथागत गौतम बुद्ध! – डॉ. आश्लेषा जाधव यांचे प्रतिपादन, साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचा समारोप, मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक गजानन जोगदंड यांच्यासह माध्यमातील प्रतिनिधींचा सत्कार

Santosh Awchar

… अन्यथा अन्न व्यवसायिकां वर कारवाई करण्यात येईल

Santosh Awchar

शेतकऱ्याने लावली गांजाची झाडे ! गांगलवाडी येथे दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही

Santosh Awchar

Leave a Comment