मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ पुणेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल आज 2 जून रोजी दुपारी लागला. यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८८.७१ टक्के एवढा लागला आहे.
या निकालामध्येही मुलींनी मात्र आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. यावेळी हिंगोली तालुक्याचा निकाल 86.88 लागला. कळमनुरी तालुक्याचा निकाल 87.77% लागला.
वसमत तालुक्याचा निकाल 89.4% एवढा लागला. तर सेनगाव तालुक्याचा निकाल 91.29 टक्के एवढा लागला. तसेच औंढा नागनाथ तालुक्याचा निकाल 90 टक्के एवढा लागला.
एकूण हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८८.७१% एवढा लागला.
जिल्ह्यातील 3 शाळांचा निकाल 25% एवढा लागला. तर सहा शाळांचा निकाल 26 ते 50 टक्के च्या दरम्यान लागला.
29 शाळांचा निकाल 51 ते 75 टक्के या दरम्यान लागला. तर 180 शाळांचा निकाल 76 ते शंभर टक्के एवढा लागला.