मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – महाराष्ट्रात पर्यावरणासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या हिंगोली येथील संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून रोजी हिंगोली येथील नगरपरिषद वसाहत मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच सर्व प्रकारचे प्रदूषण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दर वर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या हिंगोली शहरातील नगरपरिषद वसाहत येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या वतीने यशवी गजानन जोगदंड (वय आठ महिने) शौर्य सुभाष अवचार (वय चार वर्ष) वेदांती गजानन जोगदंड (वय सहा वर्ष), अंशु सुभाष अवचार (वय दहा वर्ष) या चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक गजानन जोगदंड, संस्थेचे सचिव संतोष अवचार संस्थेच्या उपाध्यक्ष विमल जोगदंड, संस्थेचे सदस्य गजानन गायकवाड, दत्तराव अवचार यांच्यासह तानाबाई नामदेव अवचार, शंकर खडसे, विशाल आठवले, हिंगोली येथील सर्पमित्र उमेश मोहरील पाटील आदींसह मोठ्या संख्येने महिला नागरिक व तरुण उपस्थित होते.