मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सरकार व पणन विभाग महाराष्ट्र शासन आणि आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क प्रकल्प (मग्नेट) व बी. पी. जी. फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. आणि दूरदर्शन प्रोड्यूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिरची: उत्तम कृषि पद्धती’ यावर शेतकऱ्यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थित उगम उमरा येथे संपन्न झाली. कार्यशाळेत १५० शेतकऱ्यांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकऱ्यांना सक्षम होण्याच्या अनुषंगाने शासकीय योजनेचा लाभ घेतला पाहिजे. तसेच आधुनिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. शेती करत असताना विविध प्रशिक्षणातून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान व माहिती बद्दल जाणून घेऊन शेतीमध्ये त्याचा वापर केला पाहिजे.
मिरची हा मानवाच्या जेवणातील महत्वपूर्ण घटक असून हा दररोज खरेदी केला जातो. त्यामुळे शेतकरी याची लागवड करून शकतात. मिरचीची गुणवत्ता, प्रकार, लांबी, स्थानिक वाण यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
विभागीय समन्वयक अरुण नादरे यांनी कार्यशाळेची प्रस्तावना करताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ह्या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. त्याच बरोबर शेतकरी उत्पादन संस्थाचे सक्षमीकरण आणि वित्तीय आराखडा यावर मांडणी केली. शेतकऱ्यांनी एफ. पी. ओ. च्या माध्यमातून शेतमाल विक्री करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी सांगितले.
डॉ. प्रवीण गुंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण विविध पिके शेतामध्ये घेत असतो जसे की, टोमॅटो, वांगी, कांदे, कोबी तसेच मिरची पीक घेणे सोपे झाले आहे. बहुतांश शेतकरी रोपे नर्सरी मधून विकत आणतात आणि त्याची लावणी करतात पण आपण शेतकरी म्हणून आपण रोपे घरीच तयार केली पाहिजे असे सांगतिले.
तसेच रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मिरचीची निवड, रोपे कशी तयार करायचे, खते, औषधी, मिश्र पीक, अंतरपीक, मती परीक्षण, पूर्व मशागत, सापळा पिके व मिरचीवर येणारे रोग यावर मार्गदर्शन केले.
शरद चोरे यांनी मार्गरदशन करताना सांगितले की, भारतात सर्वत्र मिरची केली जाते; परंतु खूप कमी प्रमाणात केले जाते. हिरवी मिरची तिन ते चार दिवस टिकते.
मिरचीवर प्रक्रिया केल्यावर जास्त दिवस टिकते जसे की, लोणच केले तर वर्ष भर टिकते. ग्रीन सौस, रेड सौस तयार करून मिरची आपण आहारात वापरत असतो तसेच ज्यावेळेस आपण मिरचीवर प्रक्रिया करतो त्यावेळेस त्याचे मूल्ये देखील वाढते.
प्रवीण वानखेडे यांनी मिरची निर्यात कशी केले जाते तसेच बाजारपेठ आणि बाजारभाव यावर मांडणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास कांबळे यांनी केले तर आभार अनिशा दोडके यांनी मानले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी भास्कर पडुळ, सुशांत पाईकराव, धनंजय पडघण, राम खंदारे यांनी परिश्रम घेतले तर कार्यशाळेस जयाजी पाईकराव, सुशीला पाईकराव व १५० शेतकरी उपस्थित होते.