Marmik
Hingoli live News महाराष्ट्र

वाहन चोरणारी आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात! एक आयशर टेम्पो व अल्टो कार जप्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – वाहन चोरी करणारी आंतरराज्य टोळी हिंगोली पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. या टोळीकडून एक आयशर टेम्पो, एक अल्टो कार, असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील आरोपींवर अनेक राज्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कार्यवाही हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

3 जून 2023 रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत लिंबाळा येथून आयशर टेम्पो चोरी केल्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून छडा लावण्या संदर्भाने हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना सूचना देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक पथक नेमले होते.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस पथक काम करीत होते. स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनीय माहिती मिळाली की, सदर लिंबाळा येथील आयशर ट्रक चोरी करणारा इसम हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे, अशी माहिती मिळाली.

यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथक सिल्लोड येथे जाऊन आरोपी नामे खुर्शीद अहमद बशीर अहमद वय पन्नास वर्षे (रा. चंद्रानगुठा पलक अनुमान पॅलेस हैदराबाद (आंध्र प्रदेश) या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने लिंबाळा मुक्ता येथील आयशर ट्रक चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याचा मित्र नामे आरेफ अहमद शेख (रा. आळंद तालुका फुलंब्री) यास विकल्याचे सांगितले.

पोलीस पथकाने लागलीच आरेफ अहमद शेख यास ताब्यात घेतले असता त्याने सदरचा आयशर टेम्पो त्याचा मित्र नामे रोमान उर्फ शेख शाहेद अख्तर शेख रफिक (रा. रेंगटीपुरा छत्रपती संभाजीनगर), अझर अकबर शेख (रा. गारखेडा परिसर शैलेश बार जवळ छत्रपती संभाजीनगर) यांच्या मार्फतीने इसमनामे शेख शाहिद शेख वाहेद (रा. उस्मानाबाद) याला विकल्याचे सांगितले.

पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील आयशर ट्रक जप्त केला असून सदर आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता खुर्शीद अहमद बशीर, आरेफ अहमद शेख, रोमान उर्फ शेख शाहेद अख्तर शेख रफिक यांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस ठाणे अंतर्गत गुंज येथून देखील एक अल्टो कार चोरी केल्याची कबुली देऊन ती काढून दिली.

अशा प्रकारे आरोपींकडून आतापर्यंत हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे दोन गुन्हे उघड झाले आहेत. या आरोपींकडून दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

यातील आरोपी नामे खुर्शीद अहमद बशीर अहमद (वय 50 वर्षे रा. चंदनगुठ्ठा पलकनुमा पॅलेस हैदराबाद (आंध्र प्रदेश) हा वाहन चोरीचा आंतरराज्य गुन्हेगार आहे. तो मागील काही दिवसांपूर्वी जळगाव कारागृहातून सुटल्याची माहिती आहे.

तसेच आरोपी खुर्शीद अहमदवर कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र राज्यात 20 अधिक हून अधिक गुन्हे दाखल असून महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील पोलिसांना तो हवा असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्य व गोपनीय माहितीच्या आधारे आंतरराज्य गुन्हेगारास बेड्या ठोकल्या आहेत.

ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर. अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, अंमलदार गजानन पोकळे, किशोर कातकडे, लिंबाजी वावळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, प्रमोद थोरात यांनी केली आहे.

Related posts

इयत्ता 10 वी परीक्षा: इंग्रजी विषयात 5 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले; भरारी पथकाकडून कारवाई

Santosh Awchar

अपहरत झालेल्या तीन पीडित मुलींचा यशस्वीरित्या शोध! अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची उल्लेखनीय कामगिरी

Santosh Awchar

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची निवड

Santosh Awchar

Leave a Comment