Marmik
Hingoli live क्राईम

गुरुजींच्या घरी चौर्य कर्म करणाऱ्यास बारा तासात ठोकल्या बेड्या

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – तालुक्यातील फाळेगाव येथील एका शिक्षकाच्या घरी घरावरील पत्रे काढून रोख रक्कम आणि तूर सोयाबीन लोखंडी रोड आधी चोरून नेले होते या प्रकरणाचा बारा तासात छडा लावून चोरी करणाऱ्या चोरट्यास बारा तासाच्या आत बेड्या ठोकण्यात आले आहेत.

हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथील शिक्षक गुणाजी फकीरा कांबळे यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की 17 जून 2023 रोजी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या फाळेगाव येथील घरावरील पत्रे काढून घरात प्रवेश करून तुर, सोयाबीन, लोखंडी रॉड व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली अशी फिर्याद दिली होती. यावरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

सदरील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना सूचना देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. घेवारे यांच्या नेतृत्वात पथक स्थापन केले होते. या पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट देऊन बारकाईने पाहणी केली.

गोपनीय माहिती काढली असता गोपनीय सूत्राद्वारे सदरची घरफोडी ही फाळेगाव येथील आरोपी नामे आनंदा यशवंत काशीदे याने केली असून चोरलेला माल त्याच्या घरी ठेवला आहे, अशी माहिती मिळाली.

या अनुषंगाने पोलीस पथक आनंदा यशवंत काशीदे याच्या घरी जाऊन छापा मारला असता चोरी गेलेले धान्य व लोखंडी रॉड मिळून आले. पोलिसांनी आरोपी नामे आनंदा यशवंत काशीदे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने सदर शिक्षकाचे घर फोडून चोरी केल्याचे कबूल केले.

तसेच चोरलेला मुद्देमाल काढून दिला. आरोपीस ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस ठाणे येथे जेरबंद करण्यात आले आहेत.

ही कार्यवाही हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. घेवारे पोलिस अंमलदार लिंबाजी वावळे, गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या पथकाने केली.

Related posts

डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अधिकारी, अंमलदार यांच्या समस्यांचे केले तात्काळ निरसन; अधिकारी अंमलदार यांच्यातून समाधान

Santosh Awchar

यंदा हिंगोली जिल्ह्यासाठी पाच स्थानिक सुट्या जाहीर         

Santosh Awchar

हिंगोलीच्या गाडीपुरा भागातील सतत गुन्हे करणारा तरुण एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध

Santosh Awchar

Leave a Comment