मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने सेनगाव नजीक दरवाढ्याचा डाव उधळला आहे. यावेळी दरोडेखोरांच्या ताब्यातून चोरलेल्या शेळ्या, खंजीर, मिरची पूड, दोरी व मोटरसायकल असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील माला विरुद्धच्या गुन्ह्याचे समोर उच्चाटन करून आरोपी अटक करण्या संदर्भात प्रभावी रात्रगस्त व कोंबिंग करण्याच्या सूचना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना दिल्या होत्या.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक 2 जुलै रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास गोरेगाव ते सेनगाव रोडवर पेट्रोलिंग करीत होते.
सदरील पथक गोरेगाव रोडवरील हॉटेल रानमाळ धागा जवळील परिसरात आले असता तेथे रोड लगत एका झुडपाच्या आडोशाला काही इसम शेळ्या घेऊन थांबलेले दिसले. पोलीस पथकाने सदर इसमांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या जवळ जात असताना सदर पाचही व्यक्ती पोलिसांना पाहून ठोकली.
पोलिसांनी सिनेस्टाईल तब्बल एक किलोमीटर पाठलाग करून त्यातील एका व्यक्तीस पकडले. सदरील व्यक्तीची विचारपूस केले असता त्यांनी त्याचे नाव तुळशीराम ज्ञानू चव्हाण वैचारिक वर्ष रा. इंचा असे सांगितले.
तसेच पळून गेलेल्या इसमाचे नाव संतोष कमल्या चव्हाण (रा. खरबी), कठाळू ज्ञानू चव्हाण (रा. इंचा) व इतर दोन असे पाच लोक असल्याचे सांगितले.
सदर चोरट्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ शिवनी खुर्द तालुका सेनगाव या गावातून काही तासांपूर्वीच चोरलेल्या दोन शेळ्या, एक खंजीर, मिरची पूड, दोरी व मोटार सायकल असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
सदर चोरट्याने शिवनी खुर्द या गावातून शेळ्या चोरल्याची कबुली देऊन दरोडा टाकण्याच्या इराद्याने रोड लगत थांबण्याचे सांगितले. सदर आरोपी विरुद्ध मागील वीस वर्षात अनेक घरफोडी, चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सदर पाचही आरोपींविरुद्ध सेनगाव पोलीस ठाणे येथे भादविनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाही हिंगोलीच्या डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार किशोर कातकडे, विठ्ठल काळे, निरंजन नलवार, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर व प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.
अंधारामध्ये सुद्धा दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करून शेतमजुराच्या शेळ्या चोरीचा गुन्हा दाखल उघड करून दरोड्याचा डाव उधळल्याबद्दल पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.