मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवासी असलेले परमेश्वर इंगोले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे 6 जुलै गुरुवार रोजी 6 निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वर इंगोले यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व मेहबूब शेख यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
परमेश्वर इंगोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविले असून ते नेहमीच सामाजिक कार्यात व गोरगरिबांच्या अडचणी सोडविण्यात तत्पर असतात महाराष्ट्र मधील असलेला त्यांचा जनसंपर्क त्यामुळे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल त्यांचावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नागरिकांच्या आग्रहाखातर त्यांना राष्ट्रवादीकडून आजेगांव जिल्हा परिषद गटातून निवडणूक मैदानात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे.