मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कामिका एकादशी आणि परतवारी निमित्त संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी नरसी नामदेव येथे भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. रांगेत उभे राहून भाविकांनी संत नामदेव महाराजांचे दर्शन घेतले. यानिमित्त नरसी येथे अवघी पंढरी अवतरल्याचे चित्र होते.
आषाढ एकादशी निमित्त श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी हिंगोली तालुक्यात असलेल्या नरसी येथील विठ्ठलाचे भक्त संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे गेली होती.
आज 13 जुलै गुरुवार रोजी कामिका एकादशी आणि परतवारी असल्याने विठ्ठलाला भेटून आलेल्या संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी हिंगोली जिल्हा तसेच मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणावरून भाविकांनी व वारकऱ्यांनी नरसी येथे मोठी गर्दी केली होती. यावेळी रांगेत उभे राहून वारकरी, भाविकांनी दर्शन घेतले.
भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संत नामदेव मंदिर संस्थानच्या वतीने सर्व सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
तसेच यावेळी आलेल्या भाविकांना फराळ आणि चहा – पाण्याचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त होता. यानिमित्त नरसी येथे अवघी पंढरी अवतरल्याचे चित्र होते.
विविध ठिकाणी फराळाचे वाटप
परत वारी आणि कामिका एकादशीनिमित्त आज 13 जुलै गुरुवार रोजी हिंगोली तालुक्यातील सवड, केसापूर, घोटा, देऊळगाव रामा, वरुड व राहोली येथील ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी व भाविकांनी रांगेत उभे राहून फराळाचा लाभ घेतला. राहोली बु .फाट्यावर रवी डोरले पाटील मित्र मंडळा तर्फे पाच ते सहा हजार भाविक भक्तांना चहा पाण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी रवी डोरले, सचिन डोरले ,संदीप डोरले, आनंदराव सोडगिर ,आत्माराम डोरले ,संजय डोरले ,सुहास सोडगीर ,रामप्रसाद डोरले, पिंटू नानवटे ,गजानन डोरले ,तानाजी डोरले, बाळा डोरले, शिवाजी डोरले ,सुनील जाधव ,भानदास डोरले ,सुधीर सोडगीर ,नामदेव ननवाटे, रामराव डोरले, मोनू लोणकर ,सुधीर गरड, गणेश डोरले ,गजानन नानवटे, मानकरी ,संदीप नानवटे, सागर डोरले परमेश्वर डोरले, व इतर नागरिक उपस्थित होते.