मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – 18 एप्रिल रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसाने हिंगोली शहरासह जिल्ह्यातील काही भागात शेतकरी व ग्रामस्थांची मोठी दाना दान उडवून दिली. यामध्ये हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथे ओढ्याला मोठा पूर येऊन ओढ्यावरील पूल वाहून गेला. तसेच शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले. तसेच संसार उपयोगी साहित्य आणि धान्यही वाहून गेल्याची माहिती मिळते. पूल वाहून गेल्याने या गावचा संपर्क कुठला आहे
मोसमी पाऊस सुरू होऊन काही दिवस उलटल्यानंतर व पावसाचे काही नक्षत्र कोरडे गेल्यानंतर जुलै महिन्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. जुलै महिन्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला; मात्र 18 जुलै रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.
रात्री साडेसहा ते सात वाजेपासून हिंगोलीसह जिल्हाभरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री बारा ते साडेबारापर्यंत हा पाऊस सतत पडत राहिला.
या पावसाने हिंगोली शहरातील एनटीसी, आजम कॉलनी, इंदिरा चौक, कपडा गल्ली, मंगळवारा परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
या भागात रोडवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील मस्तानशहा नगर भागात नाल्याचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसले.
या पावसाने हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतकरी व ग्रामस्थांची ही दाणादाण उडवून दिली. 18 जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसाने हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथील नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला.
पूर एवढा मोठा होता की, या नाल्या शेजारील असलेल्या बौद्ध बांधव व घिसडी समाजाच्या ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले. यामध्ये काही ग्रामस्थांचे संसार उपयोगी साहित्य व अन्नधान्य वाहून गेले.
तसेच शेतकरी भाऊराव कदम यांच्या गाईचे वासरू, गोरे व म्हशीचे वघारू तसेच शेतकी अवजारे, पाईपलाईनच्या छड्या या पुरात वाहून गेल्या.
या पुराने येथे मोठे नुकसान झाले असून तलाठी चौधरी व ग्रामसेवक गजानन बोरकर तसेच सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
तलाठी चौधरी व ग्रामसेवक गजानन बोरकर यांनी झालेल्या नुकसानीचा अहवाल शासन प्रशासनास सादर करून ग्रामस्थांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी तात्काळ कारवाई करू असे सांगितले.