मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास पर्यावरण मित्र तथा सर्पमित्र उमेश पाटील व इतरांनी बाहेर काढून जीवनदान दिले.
हिंगोली तालुक्यातील राहोली बुद्रुक येथील शेतकरी गंगाराम लोणकर हे आज 20 जुलै रोजी पहाटे शेतात गेले असता त्यांना त्यांच्या विहिरीत कोल्हा पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हिंगोली येथील पर्यावरण मित्र तथा सर्पमित्र उमेश पाटील व हिंगोली येथील वन विभागाचे कर्मचारी भालेराव यांना याबाबत माहिती दिली.
सदरील कोल्हा विहिरीत पडल्याचे समजतात हिंगोली येथील पर्यावरण मित्र तथा सर्पमित्र उमेश पाटील, आदित्य काळे, आकाश, वैभव शिंदे, उमेश सोडगीर, आकाश भावसार, विश्वा जावळे, मोहन लोणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच हिंगोली येथील वन भागातील कर्मचारी भालेराव यांच्या निगराणीखाली मोठ्या प्रयत्नाने या कोल्ह्यास विहिरीतून बाहेर काढत त्यास जीवनदान देण्यात आले. या कोल्ह्यास विहिरीतून बाहेर काढल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.