मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मणिपूर येथे आदिवासी महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आली. तसेच त्यांच्या शरीराची विटंबना करून क्रूर व अमानुष अत्याचार करण्यात आले. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून मणिपूर येथील सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा हिंगोली च्या वतीने कळमनुरी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
देशातील मणिपूर राज्य मागील तीन महिन्यांपासून धुमसत आहे. 19 जुलै रोजी येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेचा आणि मणिपूर येथे सुरू असलेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध करण्यासाठी आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा हिंगोली च्या वतीने 21 जुलै रोजी आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हिंगोली जिल्हा अध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी कळमनुरी यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले.
मणिपूर मानसिक हिंसेने होरपळत आहे. तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी जाणीवपूर्वक या हिंसेला खतपाणी घातले आहे.
याचा निषेध संघटनेच्या वतीने करून या हिंसाचारात विरोधी घटाला धडा शिकवण्यासाठी आदिवासी समूहातील स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करण्याचे घृणास्पद प्रकार घडत आहेत. अलीकडे एका व्हिडिओ क्लिपद्वारे उघडकीस आले आहे.
या व्हिडिओ क्लिप मध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्या शरीराची विटंबना करून त्यांच्यावर क्रूर व अमानुषपणे अत्याचार केले जात आहेत. या घटनेचा संघटनेच्या वतीने तीव्र अधिकार करण्यात आला.
तसेच मणिपूर येथील राज्य व केंद्र सरकारने तातडीने मणिपूर राज्यातील हिंसाचार हाताळण्यासाठी व येथे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करून हिंसाचार थांबवावा. या हिंसाचारात लक्ष्य झालेल्या पीडितांचे पुनर्वसन करावे. तसेच त्यांना आवश्यकते सर्व सहाय्य करावे.
मणिपूर येथे आदिवासी महिलांची विवस्त्र करून धिंड काढणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.
मणिपूर येथील हिंसेला राज्य व केंद्र सरकार यांनी जाणीवपूर्वक खतपाणी घातल्याने याचा आम्ही निषेध करतो असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. सतीश पाचपुते, तालुका अध्यक्ष बबन डुकरे, सुरज आसोले, भगवान ढाकरे, अंकुश खरबाडे, नागोराव मस्के, बळीराम असोले, शामराव झाडे, प्रथमेश रिठे, पवन असोले, शंकर फोपसे, आशिष काळे, बालाजी असोले, आत्माराम देवराव, भारत टार्फे, साहेबराव असोले, माधव असोले, ज्ञानेश्वर, दर्शन ढाकरे, माधव गजानन आसोले, लिंबाजी असोले, अजय आडे, देवानंद श्रीरंग, आकाश भुरके, स्वप्निल खोकले विश्वनाथ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.