मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जिल्हाधिकारी यांच्या 19 जुलै, 2023 च्या पत्रानुसार औंढा नागनाथ तालुक्यातील कोतवाल पदाच्या रिक्त 10 जागांची पदभरती राबविण्यात येत आहे. या पदासाठी 25 जुलै. 2023 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत औंढा नागनाथ तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन औंढा नागनाथचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
कोतवाल पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र, अपात्र उमेदवारांची यादी दि. 10 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र पोस्टाने प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांना तहसील कार्यालयातून दि. 24 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत प्रवेशपत्र देण्यात येणार आहे.
लेखी परीक्षा दि. 27 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. प्राथमिक उत्तरतालिका दि. 29 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
प्रसिध्द केलेल्या उत्तर तालिकेवर दि. 30 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आक्षेप, हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. अंतिम उत्तरतालिका दि. 1 सप्टेंबर, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
लेखी परिक्षेतील गुणानुसार गुणवत्ता यादी दि. 4 सप्टेंबर, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी मूळ कागदपत्राची पडताळणी करण्यात येऊन दि. 8 सप्टेंबर, 2023 रोजी अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय, औंढा नागनाथ येथे संपर्क साधावा, असे आवाहन विठ्ठल परळीकर, तहसीलदार तथा सदस्य सचिव, तालुका निवड समिती, औंढा नागनाथ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.