Marmik
Hingoli live क्राईम

हिंगोली पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; तडीपरीचे आदेश झुगारून वावरणाऱ्या दोघांना पकडले

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने हिंगोली जिल्हा पोलिसांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळेस विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये हद्दपारिचे आदेश डावलून वावरणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याविरुद्ध 142 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून-छपून चालणारे अवैध धंद्याबाबत कठोर भूमिका घेत तसेच यापूर्वी गंभीर गुन्ह्यातील व चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा या गुन्ह्यातील आरोपीस नियमित तपासणी व त्यांच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक कार्यवाही केली आहे.

याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही फरार व पाहिजे तसेच न्यायालयाच्या वॉरंटमधील आरोपी यांचा शोध अशा व्यापक हेतूने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 23 जुलै रोजी च्या रात्री 11 वाजेपासून 24 जुलै च्या सकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत देशपांडे, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे,

सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, सर्वच पोलीस ठाण्यामधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.

या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 42 ठिकाणी जेथे रेकॉर्ड वरील व सराईत गुन्हेगार आहेत, अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील परार व तडीपार आदेश झालेले व फरार व पाहिजे असलेले आरोपींचीही तपासणी करण्यात आली.

या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध 4 तर हिंगोली शहर पोलीस ठाणे यांच्याकडून 1, वसमत शहर पोलीस ठाणे यांच्याकडून 1, वसमत ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याकडून 1, हट्टा पोलीस ठाण्याकडून 1, असे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध हत्यार कायदा कलम 4 /25 अन्वये 8 गुन्हे दाखल करण्यात आले.

या मोहिमेत न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नसलेल्या व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते, अशा एकूण 8 अटक वॉरंट मधील व्यक्तींना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले.

हद्दपारिचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात लिंबाळा मक्ता परिसरात वावरताना दोघेजण मिळून आले. त्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

Related posts

सारोळा येथे गावठी पिस्टल जप्त; एक जण ताब्यात

Santosh Awchar

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 8 मार्च रोजीजागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन  

Santosh Awchar

ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे उद्घाटन

Santosh Awchar

Leave a Comment