Marmik
Hingoli live क्राईम

मोबाईल टॉवरच्या तांब्याचे केबल व सोलार पॅनल चोरणारे दोघे गजाआड; 12 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरालगत असलेल्या बळसोंड भागातून मोबाईलच्या टावरचे तांब्याचे केबल व सोलार पॅनल चोरी करणाऱ्या दोघांना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून 12 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बळसोंड भागातून 11 जुलै रोजी सीजी कंट्रक्शन जिओ टावरचे ऑफिस येथून अज्ञात चोरट्यांनी व्हरांड्यातून मोबाईल टॉवरच्या तांब्याचे केबल अंदाजे 130 मीटर किंमत 62 हजार रुपये व 2500 रुपये किमतीचे दोरी, असे 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याच रात्री कुरुंदा पोलीस ठाणे अंतर्गत दरेगाव येथील सोलार पॅनल येथून कपल 14 पॅनल किंमत 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोत्यांनी चोरून नेला होता. याबाबत कुरुंदा पोलीस ठाण्यात ही भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याबाबत हिंगोलीचे डॅशिंग व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देऊन मार्गदर्शन केले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांचे तपास पथकाने नमूद घटनास्थळी व परिसरात भेटी देऊन तंत्रशुद्ध तपास पद्धती व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने सदरचे गुन्हे हे येळी तालुका औंढा नागनाथ येथील राहणारे गंगाधर सांगळे आणि बालाजी घुगे यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय सीताफिने नमूद दोन्ही इसम गंगाधर नारायणराव सांगळे (वय 37 वर्ष) व बालाजी विठ्ठल घुगे (वय 24 वर्षे दोन्ही रा. येळी तालुका औंढा नागनाथ) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी नमूद दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली.

सदर आरोपींकडून वरील दोन्ही गुन्ह्यातील 62 हजार 500 रुपयांचे अंदाजे 120 मीटर मोबाईल टॉवरच्या ताब्याचे केबल व दोरीचे बंडल, एक लाख चाळीस हजार रुपयांचे जे.के. कंपनीचे सोलार पॅनल एकूण 14 नग व एक चार चाकी बोलेरो किंमत दहा लाख रुपये असा एकूण 12 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक रचना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी व्हावळे, विठ्ठल काळे ज्ञानेश्वर, पायघन हरिभाऊ गुंजकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व पोलिस अंमलदार दत्ता नागरे सायबर सेल हिंगोली यांनी केली.

Related posts

हॉटेल चालक, बार व्यवस्थापकाने टाकला दरोडा! पोलिसांनी अवघ्या चार तासात ठोकल्या बेड्या

Gajanan Jogdand

पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा डाव उधळला! घातक हत्यारासह तीन जण ताब्यात!!

Gajanan Jogdand

सणासुदीत प्रवाशांना दिलासा, खाजगी प्रवासी बस धारकांच्या मनमानीला बसणार चाप

Gajanan Jogdand

Leave a Comment