मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी 28 जुलै रोजी सामाजिक उपक्रम घेतला. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील दुर्बल घटकातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
हिंगोली चे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी 27 जुलै रोजी संत नामदेव कवायत मैदान येथे जिल्ह्यातील दुर्बल घटकातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर घेतले.
या शिबिरात नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्ररोग तज्ञ समृद्धी मोरे, डॉ. फैजल खान डॉक्टर मनीष बगडिया, डॉ. माधवी घट्टे, डॉ. कंठे, डॉ. करपे, डॉ. मुटकुळे या सर्व डॉक्टरांचे सहकार्य लाभले जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील या शिबिरास सहकार्य केले.
सदरील उपक्रम अंतर्गत एकूण 177 लाभार्थ्यांनी डोळे तपासणी केली. त्यामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन साठी 37 लाभार्थी पात्र ठरले तर 121 जणांना चष्मे वाटप करण्यात आले.
हिंगोली पोलीस कायद्याच्या अंमलबजावणी सोबत सामाजिक जाणीवने दुर्बल घटकातील नागरिकांना दृष्टी दिल्याने या उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.
या उपक्रमात हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, प्रभारी गृह पोलीस उपाधीक्षक सोनाजी आमले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी, अंमलदार यांनी सहभाग घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला.