मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते उपस्थित.
अधिकारी कर्मचारी व मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.