Marmik
Hingoli live News क्राईम

भाजयुमूचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार! दोन गोळ्या पाठीत घुसल्या, सरकारी कार्यालयातील सुरक्षा ऐरणीवर!!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला यामध्ये पप्पू चव्हाण यांच्या पाठीत दोन गोळ्या लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना नांदेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

हिंगोली येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण हे 1 ऑगस्ट रोजी कामानिमित्त जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी दोन अज्ञात युवकांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या पाठीत लागल्या. या हल्ल्यात ते जखमी झाले. हल्लेखोर गोळीबार करून फरार झाले. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच आमदार तानाजीराव मुटकुळे व इतर भाजप नेते व पदाधिकारी रुग्णालयासमोर जमले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील ह्या दाखल झाल्या होत्या.

जिल्हा परिषदेची सुरक्षा यंत्रणा कुठे?

हिंगोली येथे सर्वच सरकारी कार्यालय आणि विभागात सुरक्षा यंत्रणा नसल्याचे दिसते. परिणामी हल्लेखोर बिनबोघाटपणे शस्त्र घेऊन कार्यालयात घुसतात. जिल्हा परिषदेस देखील 1 ऑगस्ट रोजी असेच घडले येथे सुरक्षारक्षक असता तर सुरक्षारक्षकाने तपासणी केली असती परिणामी अशी घटना घडली नसती. आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते.

पोलिसांसमोर मोठे आव्हान

हिंगोली चे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन राबविले जात आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींची तपासणी देखील केली जात आहे. असे असताना एक ऑगस्ट रोजी अजय युवोचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार कसा झाला? हल्लेखोर कोण? याचा छडा पोलिसांनी लावायला हवा. दोन दिवसापूर्वी च हिंगोली येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती कारवाई करत असताना जिल्ह्याचा क्राईम रेट देखील नियंत्रणात असणे गरजेचे आहे.

Related posts

सिंचन विभागाच्या परिसरात उमलले रानफुले; येणाऱ्यांचे घेताहेत लक्ष वेधून

Gajanan Jogdand

वृत्तपत्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन

Gajanan Jogdand

अनुसुया बाल विद्या मंदिरातील लहानग्यांचे ‘पावले चालती पंढरीची वाट…’

Santosh Awchar

Leave a Comment