मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद परिसरात अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. यामध्ये पप्पू चव्हाण जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्याच्या तपासा अनुषंगाने पोलिसांना काही पुरावे मिळाले असून सदरील हल्ला हा पूर्ववादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे चार आरोपींमध्ये एक जण पप्पू चव्हाण यांचा भाचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पप्पू चव्हाण हे मोक्यातील आरोपी असून याचाही तपास पोलीस करत आहेत.
1 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषद परिसरात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
सदर घटनास्थळी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक टीम, डॉग युनिट यांनी भेट दिली घटनास्थळी पोलिस पाहणी करत असताना पोलिसांना बुलेट सह एक मोबाईल मिळाला. पोलिसांनी सदर मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर सदर मोबाईल चेक केला असता मोबाईल हा अक्षय इंदोरिया या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी सदर मोबाईल मधील ध्वनिमुद्रित झालेल्या रेकॉर्डिंगची तपासणी केली असता त्यातील संभाषणावरून इसम नामे अक्षय इंदोरिया, सत्यम देशमुख, ओम पवार, अजिंक्य नाईक व एक अल्पवयीन मुलाची संभाषण रेकॉर्डिंग मिळून आली.
सदर रेकॉर्डिंग मध्ये पप्पू चव्हाण यांनी त्यांना केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी कट रचून शस्त्र हस्तगत करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत जखमी पप्पू चव्हाण यांना पोलिसांनी विचारपूस केले असता त्यांनीही वरील लोकांसोबत वाद झाले होते, असे तोंडी सांगितल्याने व त्यांच्यावर फायरिंग झाली तेव्हा त्यांनी आरोपीला पाहिले असता तो इसम अक्षय इंदोरिया असल्याचे त्यांना दिसले.
अक्षय इंदोरिया याचे एका पप्पू चव्हाण समर्थक कार्यकर्त्याच्या मुली सोबत प्रेम संबंधातून पप्पू चव्हाण व मुलीकडे लोकांनी अक्षय इंदोरिया व ओम पवार यांना मागील दोन महिन्यापूर्वी जबर मारहाण केली होती.
तसेच त्यानंतर सत्यम देशमुख याने पप्पू चव्हाण समर्थक मुलीच्या नातेवाईकांना सांगून सत्यम देशमुख, अजिंक्य नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे माहिती मिळाली होती. त्यामुळे वरील आरोपींनी त्यांच्यासोबत झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सदरचा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले.
तसे पुरावे देखील मिळाले. त्यावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भादवि सह कलम 4/ 25 अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील दोन आरोपी अटक असून एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, दोन जिवंत राऊंड व गुन्ह्यात वापरलेले वाहने जप्त करण्यात आले आहेत. आरोपी पैकी ओम पवार हा पप्पू चव्हाण यांचा नात्याने भाचा आहे.
तसेच पप्पू चव्हाण यांच्यावर देखील 19 गुन्हे दाखल असून मोक्यातील आरोपी आहेत. याचाही तपास चालू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.