Marmik
Hingoli live Love हिंगोली महाराष्ट्र

रानकवी विसावला! पद्मश्री ना. धो. महानोर यांचे निधन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

पुणे, संभाजीनगर, हिंगोली – महाराष्ट्राला पडलेले एक सुरेख निसर्ग स्वप्न अशी ज्यांची ओळख करून दिली जात होती ते ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धो. महानोर यांचे 3 ऑगस्ट रोजी पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना किडनीचा त्रास होता. ते 81 वर्षांचे होते.

पद्मश्री ना. धो. महानोर यांचा जन्म मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगाव येथील महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

मात्र त्यांचे शिक्षण पहिल्या वर्षापर्यंत झाले. शिक्षण सोडून ते आपल्या गावी शेती करायला लागले. ते निसर्गाशी, इथल्या मातीशी एकरूप होते.

मराठी साहित्य विश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो त्यांनी मराठी साहित्यात काही वेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. त्यांनी आपल्या कवितांमधून बालकवी व बहिणाबाई यांचा वारसा समृद्ध केला.

कवी ना. धो. महानोरांचे पानझड तिची कहाणी पळसखेडची गाणी हा मराठवाडी लोकगीतांचा खजिना आहे. त्यांच्या रानातल्या कवितांना खरा मातीचा गंध असायचा. त्यांच्या गीतांमधून कवितांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडायचं. त्यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गीत लिहिली, तशा ठसकेबाज लावण्याही महाराष्ट्राला दिल्या.

श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारे कवी महानोर यांची ‘श्रावणाचे ऊन मला झेपेना’ ही लावणी लोकप्रिय आहे, आशा भोसले यांनी एक होता विदूषक या चित्रपटासाठी ते गायली आहे.

आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांबुळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती अशी एकाहून एक गाणी ना.धों. महानोर यांनी लिहिली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळला असून अनेकांनी आपापले प्रतिक्रिया आणि मते नोंदवली आहेत.

त्यांच्याबाबत हिंगोली येथील अनेकांनी मार्मिक महाराष्ट्रकडे आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यातील काही नामांकित कवींच्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.

‘अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो ….’

‘मज कळेना चालताना दुःख कैसे फुल झाले अन् कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले’ रांगोळी म्हणून प्रसिद्ध असलेले ना. धो. महानोर हे आज आपल्यात नाहीत पण त्यांनी लिहिलेल्या कविता अजरामर आहेत. नवसाहित्यिकांशी त्यांचा असलेला सुसंवाद सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ‘अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो’ या ओळी साहित्याबद्दल त्यांच्या मनातील नितांत आदर दाखवतात. ज्येष्ठ साहित्यिक ना.धो. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर आपली पोकळी कुणीच भरून काढू शकणार नाही.

– मीराताई कदम कवयत्री, (शिक्षिका, हिंगोली)

ना. धो. महानोर यांच्या लिहिण्यातून हिरवाई फुटायची

पाऊस पडून गेल्यावरचा मृदगंध म्हणजे महानोर होते. त्यांच्या बोलण्यातून निसर्ग पाझरायचा, लिहिण्यातून हिरवाई फुटायची. सृष्टीतला नवनवोन्मेष म्हणजे रानकवी महानोर ….

मीनाक्षी पवार, कवयित्री (वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगोली)

ना. धो.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

साहित्य क्षेत्रातील एक उल्लेखनीय नाव म्हणजे रानकवी ना.धो. महानोर यांचे नुकताच 3 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ना.धो. महानोर यांनी अनेक नवोदित साहित्यिकांना खूप चांगले मार्गदर्शन केल्याने अनेक नवोदित साहित्य नावारूपाला आले आहेत.ना.धो. महानोर नेहमी साहित्यिकांना सांगायचे साहित्य लिहित रहा, साहित्य लिखाण थांबू नका. आपण लिहिलं साहित्य हे आपल्या आत्मिक समाजासाठी असणे तर जरुरी आहेच पण आपण लिहिलं साहित्य हे समाज उपयोगी पण असणे जरुरी आहे असे नेहमी महानोर सांगायचे. ना धो महानोर सरांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ना. धो. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

शिवाजी कराळे, कवी, हिंगोली.

Related posts

हट्टा पोलिसांची विशेष कामगिरी: बारा तासात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद, मुद्देमाल ही हस्तगत

Santosh Awchar

भोसी येथील महिला गेली वाहून! नंदगाव शिवारात सिद्ध नदीकाठी आढळला मृतदेह

Gajanan Jogdand

हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Santosh Awchar

Leave a Comment