Marmik
Hingoli live Love हिंगोली

लोकसभेसाठी स्थानिक उमेदवाराची चाचपणी व्हावी; विकासशील उमेदवार शोधण्याचे आव्हान!

राजकारण – गजानन जोगदंड

हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा आणि त्या सोडवण्यास कटिबद्ध असणारा असा उमेदवार शोधण्यास आतापासून सुरुवात करायला हवी. कारण लोकसभा निवडणुका येत्या काही महिन्यात केव्हाही लागतील. त्यासाठी स्थानिक उमेदवाराची चाचणी करायला हवी .असा स्थानिक उमेदवार हिंगोली करांनी न शोधल्यास पुन्हा बाहेरील उमेदवार निवडून देण्याची वेळ त्यांच्यावर येईल. मग….

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका आता येत्या काही दिवसात होतील. या निवडणुकीत हिंगोली करांना प्रामुख्याने स्व. राजीव सातव यांचे स्मरण होईल. त्यांच्यासारखा नाही; पण स्थानिक उमेदवार लोकसभेवर निवडून आणायचे हे स्वप्न हिंगोलीकरांचे असायला हवे. हिंगोली लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचे प्रामुख्याने उमेदवार निवडून आलेले आहेत. तर तीन वेळा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा काँग्रेसचे प्रत्येकी एक वेळा असे उमेदवार निवडून आलेले आहेत.

सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली जिल्ह्यातील 3, यवतमाळ जिल्ह्यातील 1 आणि नांदेड जिल्ह्यातील 2 असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून बनलेला आहे.

सन 1977 वर्षी जनता पार्टीचे चंद्रकांत रामकृष्ण पाटील हे लोकसभेवर निवडून गेले. तर 1980, 1984 आणि 1989 यावर्षी काँग्रेसचे उत्तम राठोड हे विधानसभेतून सलग तीनदा निवडून गेले. त्यानंतर मात्र चित्र पालटले आणि 1991 वर्षी शिवसेनेचे विलासराव गुंडेवार या लोकसभा मतदारसंघातून संसदेवर निवडून गेले.

त्यानंतर 1996 साली शिवसेनेचेच शिवाजीराव माने यांची वर्णी संसदेवर लागली. त्यानंतर 1998 वर्षी काँग्रेस पक्षाकडून सूर्यकांता पाटील ह्या निवडून आल्या 1999 वर्षी पुन्हा शिवाजीराव माने हे हिंगोली विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.

पुढे 2004 यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून सूर्यकांता पाटील ह्या संसदेवर निवडून गेल्या 2009 वर्ष सुभाष वानखेडे हे शिवसेनेकडून विजयी झाले. 2014 वर्षी काँग्रेसचे स्व राजीव सातव निवडून गेले. त्यानंतर 2019 यावर्षी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून शिवसेनेचे हेमंत पाटील हे विजयी झाले.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात 3 जिल्ह्यातील विधानसभांच्या मतदारसंघातून निर्माण झालेला लोकसभा मतदार संघ आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी आणि हिंगोली या विधानसभांचा अंतर्भाव होतो. सर्वाधिक विधानसभा ह्या हिंगोली जिल्ह्यातील असल्याने हिंगोली लोकसभेवर स्थानिक उमेदवार निवडून येणे फार गरजेचे आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे ओस पडत चालले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. सुशिक्षितांच्या समस्या आहेत. बेरोजगारांच्या समस्या आहेत.

अपंग, निराधारांच्या समस्या आहेत. परीतक्ता महिलांच्या अनेक समस्या आहेत. आरोग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती यांना चालना देणारा, त्याचप्रमाणे राशन धान्याचा घोटाळा आहे. शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे. रस्त्यांच्या समस्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे. आणि विशेष म्हणजे घर जमिनी यांची रजिस्ट्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागतोय. त्यात पुन्हा ग्रामसेवक आणि तलाठी यांचे दर वेगळेच असतात ते सर्व सर्वसामान्यांना द्यावे लागते यातून मोठा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.

ह्या सर्व समस्या जाणून घेण्यासाठी आणि या समस्यांची जाण असणारा आणि उमेदवार हिंगोली लोकसभेतून संसदेवर निवडून जावा आणि त्यांनी प्रश्न सोडवावेत ही आशा हिंगोली करांची आहे; पण सर्वच राजकीय पक्षांना असा विकासशील उमेदवार शोधण्यात मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. ऐनवेळी काय घडते याकडे पाहणे गरजेचे आहे.

रामदास सुमठाणकर पाटील यांची तयारी सुरू

हिंगोली नगर परिषदेतून मुख्याधिकारी म्हणून पदभार सांभाळणारे आणि नंतर शासनास आपल्या सेवेचा राजीनामा देत पूर्णवेळ राजकारणात उतरलेले रामदास पाटील सुमठाणकर हे मागील कित्येक दिवसांपासून हिंगोली लोकसभेसाठी तयारी करत असल्याचे दिसते. त्यांनी त्यांच्या मुख्याधिकारी कार्यकाळात नगर परिषदेस भरघोस निधी आणून शहरातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला. तसेच त्यांच्या विधानसभा मतदारसंघात माणसं आणि कार्यकर्ते जोडण्याचे काम त्यांचे तेव्हाही सुरू होते, असे समजते. त्यांच्या हातून हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे हे विविध कामांचे उद्घाटन करून घेत आहेत. यातून त्यांची लोकसभेची तयारी सुरू असल्याचे दिसते. रामदास पाटील सुमठाणकर हे विद्वत्तापूर्ण, मृदू स्वभावाचे असले तरी ते जिल्ह्याबाहेरचे आहेत. ते लोकसभा निवडणूक लढवत असतील तर त्यांना मतदार किती पसंत करतात हे लोकसभेच्या निवडणुकांतून स्पष्ट होईल.

स्थानिक उमेदवाराची चाचपणी व्हावी

हिंगोली लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी धरणारे अनेक जण आहेत. आता वेळ वाया गेलेला नाही. अजून लोकसभेत सावकाश असला तरी एखादा चेहरा आतापर्यंत पुढे येणे आवश्यक आहे; मात्र अद्याप स्थानिक चेहरा पुढे आलेला नाही. लोकसभेसाठी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे नाव घेतले जात आहे. ते कितपत खरे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा, विकासशील, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती यांना चालना देणारा, जातीय सलोखा आणि सर्वधर्मसमभाव असा पुरोगामीत्वाची जाण असणारा असा उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान सर्वच राजकीय पक्षांपुढे असणार आहे. यासाठी आतापासून स्थानिक उमेदवार निवडण्यासाठी चाचपणी करायला हवी.

Related posts

कळमनुरी तहसीलदारांच्या विरोधात निराधार अपंग महिलांचे बेमुदत अमरण उपोषण ! कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आश्वासन

Gajanan Jogdand

अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये अंमली पदार्थ विरोधी ठराव घ्यावेत – जिल्हाधिकारी पापळकर

Santosh Awchar

अंगणवाडीतील गॅस सिलेंडर, बालकांच्या खाद्यपदार्थावर डल्ला मारणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुस्क्या; आरोपींमध्ये एक किराणा दुकानदार!

Santosh Awchar

Leave a Comment