मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांकडून चार ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपासून 5 ऑगस्ट रोजीच्या पहाटे 5 वाजेपर्यंत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत पोलिसांकडून अनेक जणांची उचल बांगडी करण्यात आली.
हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून छपून चालणारे अवैध धंद्याबाबत कठोर भूमिका घेत तसेच गंभीर उन्हातील व चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणे व त्यांच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही फरार व पाहिजे तसेच न्यायालयाचे वॉरंट मधील आरोपी यांचा शोध अशा व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक जी .श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 4 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजेपासून 5 ऑगस्ट रोजी च्या पहाटे 5 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
सदर मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपान शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत देशपांडे, पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, विकास पाटील, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचबांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, सर्वच पोलीस ठाण्यामधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
सदर मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 17 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार आहेत, अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली.
तसेच जिल्ह्यातील मुक्काम मधील फरार व तडीपार आदेश झालेले फरार व पाहिजे असलेले आरोपींचीही तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत महत्त्वाचे ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे एक संशयित वाहन डिटेन करण्यात आले.
तसेच सदर मोहिमेत वसमत शहर पोलीस ठाणे, हिंगोली शहर पोलीस ठाणे व कुरुंदा येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध तीन हत्यार कायदा कलम 4 / 25 अन्वये 3 गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर मोहिमेत न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहात नव्हते व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते, अशा एकूण 33 अटक वॉरंट मधील इसमांना ताब्यात घेण्यात आले.
हद्दपारिचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात हजर मिळून आल्याने एका इसमावर हिंगोली शहर पोलीस ठाणे येथे 142 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली. तर अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने संशय संशयास्पदरित्या मिळून आलेल्या इसमाविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाणे, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे, वसमत शहर पोलीस ठाणे, हट्टा, बाळापूर येथे एकूण 6 इसमाविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.