Marmik
News

जिल्हा परिषद भरती: आवेदन शुल्कासाठी तरुणाने बँकेकडे मागितले 50 हजार रुपयांचे कर्ज!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्हा परिषदेच्या विविध विभागाअंतर्गत विविध पदांसाठी आगामी काळात भरती प्रक्रिया राबविले जाणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषदांच्या या विविध पदांसाठी आवेदन शुल्क हे 1000 रुपयांपर्यंत आहे. सदरील शुल्क भरण्यासाठी हिंगोली जिल्हा शेजारील असलेल्या जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील एका तरुणाने बँकेकडे 50 हजार रुपयांचे कर्ज मागितले आहे.

महाराष्ट्र शासनाने विविध स्पर्धा परीक्षांच्या आवेदन शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. सदरील शुल्क शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या मुलांना परवडणारे नाही.

या शुल्कापोटी अनेकांना स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

राजू ज्ञानदेव वाळके असे या तरुणाचे नाव आहे. सदरील तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जिंतूर जिल्हा परभणी बँकेच्या व्यवस्थापकाकडे कर्जासाठी अर्ज केलेला आहे.

‘मी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून जिल्हा परिषदेच्या विविध पदांकरिता अर्ज करावयाचे आहेत. त्यासाठी आवेदन शुल्क हा प्रतिसंवर्गाकरिता 900 रुपये आहे.

सदरील शुल्क भरण्यासाठी मला 34 जिल्हा परिषदांकरिता अर्ज करण्यासाठी लवकरात लवकर किमान 50 हजार रुपये कर्ज मंजूर करावे’, अशी विनंती या युवकाने बँक व्यवस्थापकाकडे अर्जाद्वारे केली आहे. या अर्जावर राजू ज्ञानदेव वाळके यांची.

Related posts

कापूस व तुरीच्या उभ्या पिकात आढळली गांजाची झाडे ! दुधाळा येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Santosh Awchar

दहावी, बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात मोबाईलवर बंदी! जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Santosh Awchar

अजित मगर उचलणार शिव धनुष्य

Gajanan Jogdand

Leave a Comment