Marmik
Hingoli live

मॉक ड्रिल : औंढा नागनाथ मंदिर परिसरात घुसलेल्या दोन अतिरेक्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात!!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल :-

औंढा नागनाथ – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ मंदिर परिसरात हिंगोली पोलिसांनी मॉक ड्रिल घेतली. यामध्ये पोलिसांनी मंदिर परिसरात लपून बसलेले दोन डमी अतिरेकी यांना ताब्यात घेतले.

11 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात औंढा नागनाथ मंदिर परिसरात दहशतवादी हल्याप्रसंगी अनुसरावयाची कार्यपद्धती याची रंगीत तालीम ( mock drill ) घेण्यात आली…

सदर रंगीत तालीम मध्ये ( डमी अतिरेकी ) 02 इसम हे मंदिर परिसरात लपून बसले होते.. त्यांना पोलीस रेस्क्यू टिमनी सर्व उपाय योजना करून ( action ) ताब्यात घेतले…

सदर रंगीत तालीम नंतर BDDS पथकाकडुन मंदिर परिसराची सुरक्षेच्या दृष्टीने सविस्तर तपासणी केली गेली.

सदर रंगीत तालीम मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत देशपांडे, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण मळघणे, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, मुलतकर, दहशतवाद विरोधी शाखा हिंगोली, दहशतवाद विरोधी पथक नांदेड, BDDS पथक, QRT, RCP पथक व पोलीस स्टेशन औंढा नागनाथ येथील पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.

Related posts

खटकाळी महादेव मंदिराच्या पुजाऱ्यास लुटणाऱ्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या! एक पिस्टल, तीन जिवंत काडतूसासह तीन लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

विराट लोकमंच ने मुख्यमंत्र्यांसह शासन- प्रशासनातील सर्वांनाच केला बांगड्यांचा आहेर; निषेधही नोंदविला

Gajanan Jogdand

जिल्ह्यात बैल पोळा उत्साहात साजरा

Santosh Awchar

Leave a Comment