Marmik
Hingoli live

परमेश्वर इंगोले यांना छत्रपती संभाजी महाराज युवा गौरव पुरस्कार जाहीर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / शहर प्रतिनिधी :-

सेनगाव – तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांना युवा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा छत्रपती संभाजी महाराज युवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आशीर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा आयोजित साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार असून युवा नेतृत्व परमेश्वर इंगोले यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांना युवा क्षेत्रातील छत्रपती संभाजी महाराज युवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना युवा क्षेत्रातील महत्त्वाचा समजला जाणारा छत्रपती संभाजी महाराज युवा गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे जिल्हा भरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Related posts

निकेश कांबळे याच्या खुनाचा झाला काही तासात उलगडा; आरोपी गजाआड

Gajanan Jogdand

पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा डाव उधळला! घातक हत्यारासह तीन जण ताब्यात!!

Santosh Awchar

हिंगोली जिल्ह्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Santosh Awchar

Leave a Comment