Marmik
Hingoli live

युवा दिन : शासकीय नरसिंग महाविद्यालयात एड्स बाबत शपथ व व्याख्यानाचा कार्यक्रम

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क/ प्रतिनिधी :-

हिंगोली – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्यातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभारी जिल्ह्यात शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शासकीय नर्सिंग महाविद्यालय हिंगोली येथे एचआयव्ही / एड्स बाबत शपथ घेऊन व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आला.

तसेच विजय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील डॉ. तानाजी सावंत आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुवा संवाद एचआयव्ही / एड्स जनजागरण अभियान या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण या ठिकाणी करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील एकूण 14 रेड रिबन क्लब महाविद्यालयात ऑनलाईन प्रक्षेपण व एचआयव्ही / एड्स बाबत शपथ घेऊन व्याख्यानाचा कार्यक्रम महाविद्यालयीन युवक – युवती यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल करपे, एचटीटीएमओ डॉ. मंगेश तेहरे, डॉ. सुवर्णा महाले, डॉ. राळेगावकर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर चौधरी, आशा क्षीरसागर, कविता भालेराव, अनिता चव्हाण, खंदारे, प्रीती उपाध्य, बांगर तसेच महाविद्यालयीन युवक – युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे व मान्यवरांनी युवा दिनानिमित्त एचआयव्ही / एड्स व युवकांची भूमिका याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ज्ञानेश्वर चौधरी यांनी करून एचआयव्ही / एड्स बाबत उपस्थितांना शपथ दिली. प्राचार्य कविता भालेराव यांनी उपस्थित आमचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पवार, टीना कुंदनानी, आशिष पाटील, अब्दुल मुजीब, बालाजी चाफावानडे, रेखा बलखंडे, लक्ष्मी वाठोरे, स्वाती चोपडे, महानंदा साबळे, सुमित्रनंदन सावंत, हनुमंत वाघमारे, गंगाराम कुरुडे, फिरदोस अंजुम, आनंद चारण, चंद्रकांत कोलते, पवन इंगोले, सचिन तपसे, किशोर वानखेडे, स्वाती पारस्कर, भारतभूषण रणवीर, पठाण व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related posts

हर घर तिरंगा मोहिमे सोबतच प्रत्येकांनी covid चा बूस्टर डोस घ्यावा – जिल्हाधिकारी पापळकर

Santosh Awchar

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हिंगोलीतील नागरिकांना आंघोळ नाही! नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार

Gajanan Jogdand

दुर्ग सावंगी येथून एक घनमीटर सागवान जप्त, कर्तव्यदक्ष हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांची कारवाई

Gajanan Jogdand

Leave a Comment