Marmik
क्राईम

कोंबिंग ऑपरेशन: हिंगोली जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी, वाहनांची कसून तपासणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – येथील पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 15 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपासून 16 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन 381 वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पोलिसांकडून विविध आरोपींविरुद्ध कारवाया करण्यात आल्या.

हिंगोलीचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सरायुक्त उमेदवार व लपून छपून चालणारे अवैध धंद्यांबाबत कठोर भूमिका घेत तसेच यापूर्वी गंभीर गुन्ह्यातील व चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणी व त्यांच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी, अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही, फरार व पाहिजे तसेच न्यायालयाच्या वॉरंटमधील आरोपी शोध अशा व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 15 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपासून 16 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत देशपांडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस अंमलदार, सर्वच पोलीस ठाण्यामधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.

या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 17 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील वसराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहिजे असलेले आरोपींची ही तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन 381 वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

या मोहिमेत हिंगोली शहर पोलीस ठाणे, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत ग्रामीण पोलीस ठाणे व कुरुंदा पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4 / 25 अन्वये 9 गुन्हे दाखल करण्यात आले.

या मोहिमेत न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते अशा एकूण 15 अटक वॉरंट मधील इसमांना ताब्यात घेण्यात आले.

हद्दपारचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात हजर मिळून आल्याने दोन व्यक्तीवर हिंगोली शहर पोलीस ठाणे येथे कलम 142 मपोका अन्वयक कार्यवाही करण्यात आली तर अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या मिळून आलेल्या व्यक्तीविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाणे, हिंगोली ग्रामीण, पोलीस ठाणे वसमत शहर पोलीस ठाणे, हट्टा, बाळापुर, सेनगाव, नरसी नामदेव, कळमनुरी, औंढा नागनाथ, बासंबा, कुरुंदा पोलीस ठाणे येथे एकूण 18 इसमान विरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Related posts

जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन: 16 ठिकाणी गुन्हेगार तपासणी

Santosh Awchar

सेनगाव येथून दोघे दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

जर्मन टाक्यांची चोरी करणारे चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment