मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यात चैन स्नॅचिंग करणारी आंतरजिल्हा टोळी पकडण्यात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. आरोपींकडून 3 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या आरोपींनी हिंगोली सह नांदेड, परभणी जिल्ह्यातही जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीत मॉर्निंग व घरा पुढील अंगण लिंपणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने सलग दोन वेळा हिसकावून चोरटे प्रसार झाल्या संदर्भाने वसमत शहर पोलीस ठाणे येथे दोन जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते.
हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर गुण्याचा छळा लावण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना सूचना देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक नेमण्यात आले होते.
पोलीस पथकास सदरील आरोपी हे शिवनगर नांदेड परिसरातील आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. यावरून पोलीस पथकाने सापळा रुचून शिवनगर नांदेड येथील संशयित आरोपी नामे राहुल प्रदीप जाधव (वय 22 वर्ष व्यवसाय ऑटो चालक रा. शिवनगर नांदेड) व एक विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले.
सदर गुण्या संदर्भाने विचारपूस केली असता आरोपीने वसमत शहरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने चोरल्याचे कबूल केले.
चोरलेला सोन्याचा मुद्देमाल, सोन्याची 35 ग्रॅम वजनाची चैन व पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र / मिनी गंठण किंमत अंदाजे 2 लाख 40 हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल अंदाजे किंमत 60 हजार रुपये व मोबाईल असा एकूण तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीची अधिक विचारपूस केली असता आरोपींवर यापूर्वीचे जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून हिंगोलीसह नांदेड, परभणी जिल्ह्यातही जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
ही कार्यवाही हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, पांडुरंग राठोड, विठ्ठल कोळेकर, आकाश टापरे, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केले. तसेच शिवाजीनगर नांदेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे, पोलीस शिपाई रवीशंकर बामणे यांनी सहकार्य केले.