Marmik
क्रीडा

22 व्या हिंगोली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते बक्षीस वितरण

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – दरवर्षीप्रमाणे सन 2023 मध्येही 22 व्या हिंगोली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन हिंगोली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले होते. 17, 18, 19 ऑगस्ट अशा तीन दिवस या स्पर्धा पोलीस कवायत मैदान व क्रीडा संकुल हिंगोली येथे घेण्यात आल्या.

सदर क्रीडा स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालय तसेच हिंगोली शहर उपविभाग, वसमत उपविभाग व हिंगोली ग्रामीण उपविभाग मधील सर्व पोलीस स्टेशन मधील महिला व पुरुष अधिकारी व अंमलदार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक अशा विविध खेळाच्या प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.

सांघिक मध्ये फुटबॉल खेळ प्रकारात प्रथम विजेते पोलीस मुख्यालय हिंगोली संघ व द्वितीय विजेते उपविभाग हिंगोली शहर यांनी पारितोषिक पटकावले. तसेच हॉलीबॉल मध्ये वसमत उपविभाग प्रथम तर पोलीस मुख्यालय द्वितीय पारितोषिक पटकावले.

इतर वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या खेळाडूंना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत देशपांडे, प्रभारी पोलीस उपाधीक्षक (गृह) सोनाजी आमले , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Related posts

मुलींना पराटे येण्याबरोबर कराटे येणे महत्त्वाचे – प्रियंका सरनाईक

Gajanan Jogdand

तालुका व जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेसाठीऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन 

Gajanan Jogdand

विनश्री गडगीळे, लक्ष्मण राठोड या गुणवंत खेळाडूंचा सत्कार; सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय खेळासाठी निवड होणे हे हिंगोलीसाठी अभिमानास्पद – खा. हेमंत पाटील

Santosh Awchar

Leave a Comment