मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील अनेक गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत. अशा मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांमध्ये शिक्षक व विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या बाबीकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी केली आहे.
सेनगाव तालुक्यातील चौंडी बुद्रुक दाताळा तसेच विविध गावातील जिल्हा परिषदांच्या शाळेतील वर्ग खोल्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून मोडकळीस आले आहेत.
अशा या मोडकळीस आलेल्या वर्ण झालेल्या वर्ग खोल्यांमधून वर्ग भरून शिक्षक व विद्यार्थी जीव मोठे धरून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. असुरक्षिततेच्या वातावरणात क्षण घेतले व दिले जात असून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सेनगाव तालुक्यातील विविध गावातील जिल्हा परिषदांच्या शाळेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असून तालुक्यातील चोंडी बुद्रुक, दाताडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्यांची मोठी दुरावस्था झाली आहे.
सदरील बाबीकडे लक्ष देऊन शिक्षण विभागाने मोडकळीस आलेल्या येथील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्यासह तालुक्यातील ज्या ज्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्या जीर्ण व मोडकळीस आलेल्या आहेत त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून त्या दुरुस्त करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी केली आहे.