मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क/ संतोष अवचार :-
हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून सामाजिक शांतता व सद्भावनेचा संदेश देण्यासाठी तसेच खेळाप्रती समाजामध्ये आवड निर्माण होण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी 5 कि.मी. एकता दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेत विविध गटातून अतिश चव्हाण, काजल राठोड, पोलीस शिपाई योगेश होडगीर, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सदरची स्पर्धा ही श्री संत नामदेव पोलीस परेड ग्राउंड ते इंदिरा गांधी चौक- अग्रसेन चौक- जिल्हा परिषद नवीन रोड- पाण्याची टाकी -शिवाजीनगर चौक- छ. शिवाजी महाराज पुतळा चौक- पोस्ट ऑफिस चौक- जवाहर रोड – महात्मा गांधी पुतळा चौक- पुन्हा इंदिरा गांधी पुतळा चौक- व परत पोलीस परेड ग्राउंड अशा मार्गाने आयोजन करण्यात आली होती.
सदर स्पर्धेमध्ये हिंगोलीतील सामान्य नागरिक, तसेच खेळाडू, हिंगोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार, तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमी चे प्रशिक्षणार्थी ,पत्रकार बांधव ,डॉक्टर मंडळी ,असे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक धावपटू उपस्थित होते.सदरची स्पर्धा ही साधारणता सकाळी 7.00 वाजता सुरू होऊन 07.30 वाजता संपली.
सदर स्पर्धेमध्ये खुल्या गटातून प्रथम क्रमांक अतिश चव्हाण, द्वितीय क्रमांक ओमकार जगताप यांचा आला, तर महिला गटातून प्रथम क्रमांक काजल राठोड , द्वितीय क्रमांक अंकिता गव्हाणे यांचा आला.
तसेच पोलीस अंमलदार गटातून प्रथम क्रमांक पोशि 486/ योगेश होडगीर नेमणूक पोलीस स्टेशन हिंगोली शहर यांनी पटकावला. पोलीस अधिकारी गटातून प्रथम क्रमांक स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी पटकावला.
सर्व धावपटूंचे पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे. प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावणारे उमेदवारांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
सदर एकता दौड समारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, हिंगोली नगरपालिका मुख्याधिकारी अरविंद मुंढे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, डाॅ. मंगेश टेहरे, डॉ. श्रीकांत पाटील , प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) सोनाजी आमले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, राखीव पोलीस निरीक्षक शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.