मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 27 ऑगस्ट रोजी हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे जाहीर सभा होणार असून शिवसेना शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांची 28 ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रा निघणार आहे.
या निमित्त पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांवर 27 व 28 ऑगस्ट काही काळ वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात पुढील प्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग
खटकाळी बायपास येथून हिंगोली शहरात येणारी जड वाहने पूर्णपणे बंद. औंढा नागनाथ व नरसी टी पॉइंट कडून हिंगोली शहरात येणारी जड वाहने पूर्णपणे बंद.
अकोला बायपास वाशिम कडून हिंगोली शहरात येणारी जड वाहने पूर्णपणे बंद. अकोला बायपास गारमाळ मार्गे खटकाळी बायपासकडे येणारी जड वाहने पूर्णपणे बंद.
जवळा पळशी कडून हिंगोली शहरात येणारे सर्व जड वाहने पूर्णपणे बंद. व्ही व्ही आय पी येताना व जाताना सावरखेडा पूल ते सभा ठिकाण रामलीला मैदान पर्यंत सर्व प्रकारची वाहने बंद राहतील.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
हिंगोली शहरातून दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी, वाहनासाठी रीसाला बाजार, पिंपळखुटा रोड हायवेने कळमनुरी कडे जातील. औंढा नागनाथ कडून येणारे जड वाहने नरसी नामदेव टिपॉईंट नरसी सेनगाव मार्गे वाशिमला जातील.
कळमनुरी कडून येणारी जड वाहने हायवेने अकोला कडे जातील. तसेच परभणीला जाण्यासाठी उंबरा फाटा, पिंपळदरी औंढा नागनाथ मार्गे जातील अकोला व वाशिम कडून नांदेडकडे जाणारी वाहने हायवेने बायपास मार्गे नांदेड कडे जातील.
अकोला व वाशिम कडून येणारी व औंढा नागनाथ तसेच परभणी कडे जाणारी जड वाहने बासंबा, खानापूर, उमरा फाटा, पिंपळदरी, औंढा नागनाथ मार्गे जातील.
लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या भव्य कावड यात्रेनिमित्त 28 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग
कळमनुरी ते हिंगोलीकडे येणारा हायवे संपूर्ण वनवे पूर्णपणे बंद राहील. खटकाळी बायपास येथून हिंगोली शहरात येणारी जड वाहने पूर्णपणे बंद.
औंढा नागनाथ नरसी नामदेव टी पॉइंट कडून हिंगोली शहरात येणारी जड वाहने पूर्णपणे बंद. अकोला बायपास वाशिम कडून हिंगोली शहरात येणारी जड वाहने पूर्णपणे बंद.
बळसोंड अकोला बायपास, गारमाळ मार्गे खटकाळी बायपास कडे येणारी जल वाहने पूर्णपणे बंद. जवळा पळशी कडून हिंगोली शहरात येणारी सर्व जड वाहने पूर्णपणे बंद.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
हिंगोली शहरातून दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनासाठी रीसाला बाजार, पिंपळखुटा रोड हायवेने कळमनुरी कडे जातील. औंढा नागनाथ कडून येणारी जड वाहने नरसी नामदेव टिपॉइंट, नरसी सेनगाव मार्गे वाशिमला जातील.
कळमनुरी कडून येणारी जड वाहने हायवेने अकोल्याकडे जातील. तसेच परभणीला जाण्यासाठी उमरा फाटा, पिंपळदरी, औंढा नागनाथ मार्गे जातील.
अकोला व वाशिम कडून येणारी औंढा नागनाथ तसेच परभणीकडे जाणारी जड वाहने बासंबा, खानापूर, उमरा फाटा, पिंपळदरी, औंढा नागनाथ मार्गे जातील.
या दोन्ही दिवशी निर्धारित वेळेत वाहतुकीस अडथळा होऊ नये. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पर्यायी मार्गाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.