मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील चोरजवळा येथील अंगणवाडीतून गॅस सिलेंडर व खाद्यपदार्थांसह साहित्य चोरी करणाऱ्या आरोपींच्या हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने मुस्क्या आवळल्या आहेत. आरोपींकडून एक लाख 84 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एक किराणा दुकानदार ही समाविष्ट आहे.
24 ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरम्यान चोरजवळा गावातील अंगणवाडीतून एलसीडी टीव्ही, गॅस सिलेंडर व इतर खाद्यपदार्थ असा एकूण 20 हजार 110 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध फिर्याद देण्यात आली होती. सदरील फिर्यादीवरून गुरनं 398 / 2023 कलम 454 / 380 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा तात्काळ उघड करून आरोपी व गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांना आदेश दिले होते.
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मला पिल्लू व त्यांच्या पथकाने सदर घटनास्थळी भेट देऊन अत्यंत कौशल्यपूर्ण व जलद गतीने तपास करत गुप्त बातमीदारा मार्फत माहिती घेत अधिक तपास केला.
सदरचा गुन्हा हा चौरजवळा येथील हरिचंद्र नारायण पठाडे, रघुनाथ विश्वनाथ पठाडे, नारायण आप्पाजी भोईनवाढ यांनी व किराणा दुकानदार माधव पठाडे यांच्या संगणमतीने मिळून केल्याचे निष्पन्न झाले.
त्यांचा तात्काळ शोध घेऊन अतिशय सिताफिने नमूद सर्व आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता आरोपींनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली नमूद आरोपींकडून चार घरफोडी / चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
यातील आरोपी हरिचंद्र नारायण पठाडे व रघुनाथ विश्वनाथ पठाडे यांनी यापूर्वी हिंगोली पोलीस ठाणे व गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत चोरी व घरपोरीचे इतर तीन गुन्हे केल्याची कबुली दिली.
ही कार्यवाही हिंगोली चे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, किशोर कातकडे, निरंजन नलवार, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, हरिभाऊ गुंजकर यांनी केली.