मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर:-
सेनगाव – येथील तहसील कार्यालयातील शासकीय गोडाऊन कोणीतरी अज्ञात इसमाने पेटवून दिला. यामध्ये 21000 बारदाण्याचे खाली पोत्यांसह गोरगरिबांच्या नावे आलेला 102 पोते तांदूळ जळून खाक झाला. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.
2 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान सेनगाव येथील तहसील कार्यालय परिसरात असलेल्या शासकीय राशन मालाच्या गोडामाच्या जाळीच्या खिडकीतून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कशाच्या तरी साह्याने आग लावून देऊन गोदामातील खाली बारदाण्याचे खाली पोते 21 हजार (किंमत एक लाख पाच हजार रुपये) व 102 तांदळाचे भरलेले कट्टे (51 क्विंटल) (किंमत एक लाख 83 हजार 600 रुपये)
असा एकूण दोन लाख 88 हजार 600 रुपयाचा मालक व तहसील कार्यालयाच्या परिसरात नादुरुस्त असलेले वाहन टाटा सुमो जीप क्रमांक एम. एच. 38 जी 2828 (किंमत एक लाख रुपये) असा एकूण 3 लाख 88 हजार 600 रुपयांच्या शासकीय मालमत्तेचे अज्ञात व्यक्तीने जाळून नुकसान केले आहे.
याप्रकरणी सेनगाव तहसील कार्यालय गोदाम पाल दिलीप भीमराव कदम यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
51 क्विंटल तांदूळ जळेपर्यंत कर्मचारी होते कुठे
सदरील आग लावून देण्याची घटनाही 2 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. सदरील शासकीय गोडाऊन मध्ये गोरगरिबांच्या नावाने शासनाकडून येणारा राशनचा धान्यसाठा साठविला जातो. त्यामुळे या ठिकाणी 24 तास एखादा दोन कर्मचारी असणे गरजेचे आहे. 2 सप्टेंबर रोजी शनिवार होता. केंद्राकडून वर्किंग डे पाच दिवसाचे केले असले तरी महत्त्वाच्या ठिकाणी त्यातही धान्य साठा साठवून ठेवण्याच्या ठिकाणी खबरदारी म्हणून कर्मचारी असणे गरजेचे… सदरील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी ही अपेक्षा.