Marmik
Hingoli live News

पानकनेरगाव येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी शेतकऱ्यांचा दोन तास रास्ता रोको; सेनगाव- रिसोड महामार्गावर वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – तालुक्यातील पानकनेरगाव हद्दीत असलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी सेनगाव रिसोड महामार्गावर 5 सप्टेंबर रोजी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान आक्रमक शेतकऱ्यांनी टायरही जाळला. या आंदोलनामुळे राज्य महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरील आंदोलन मागे घेण्यात आले; मात्र 12 सप्टेंबर पर्यंत अतिक्रमण हटविल्यास 13 सप्टेंबर रोजी पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सेनगाव तालुक्यातील मौजे पानकनेरगांव हद्दीत जवळपास ३०० एकर गायरान जमीन आहे. हे गायरान जमीन गुरे चरण्यासाठी राखीव ठेवलेली आहे.

या मधील परिसरातील ग्रामस्थ शेतकरी बांधव शेकडो वर्षापासून गुरे ढोरे चरण्यासाठी या गायरान पड जमीनीचा वापर करतात व तसेच रोही, हरण, वानर, डूकर, वन्य प्राणी जंगल वस्तीचा सहारा सुद्धा घेतात.

मात्र गेल्या दोन वर्षापासून गायरान जमिनीवर काही लोकांकडून महसूल व ग्रामपंचायत डोळ्यात धूळफेक करत जंगल वस्तीतील झाडाची खुलेआम कत्तल करून त्यामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करून गायरानमध्ये अनधिकृत बेकायदेशीररित्या पिक घेतल्याचा प्रकार घडत आहे.

सदरील या बाबत गेल्या वर्षभरापासून शेतकरी बांधव जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कार्यालय ग्रामपंचायत, प्रशासनाची पायरी ग्रामस्थ झिजवत आहेत. परंतु वारंवार पत्रव्यवहार करून न्याय मिळत नव्हता.

या संदर्भात २१ आगष्ट २०२३ रोजी काही लोकांनी अनधिकृत गायरानवर कब्जा केला आहे. सदरील अतिक्रमण हटवून योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी नसता ५ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता.

सदरील महसूल व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कुठलीच दखल न घेतल्याने ५ सप्टेंबर रोजी शेकडो शेतकरी बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सदरील नायब तहशिलदार, अधिकारी शिवानंद झोळगे मंडळ अधिकारी, मेनकूदळे ग्रामविकास अधिकारी, तलाठी साहेब आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना १२ सप्टेंबर पर्यंत बेकायदेशीररित्या असलेल अतिक्रमण हटविण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.

परंतु शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसून १२ सप्टेंबर पर्यंत न हटविल्यास १३ सप्टेंबर रोजी महामार्गावर पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा शेतकर्यांनी दिला.

Related posts

दुधातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय सरकारी समिती गठीत!

Gajanan Jogdand

शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Santosh Awchar

संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हिंगोली येथे वृक्षारोपण

Santosh Awchar

Leave a Comment