Marmik
Hingoli live

जिल्ह्यातील बेकायदेशीर व अवैध कत्तलखाने, मांस विक्री कायमस्वरूपी बंद करा, जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील बेकायदेशीर व अवैध कत्तलखाने तसेच मांस विक्री कायमस्वरूपी बंद करावी असे आदेश जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी, हिंगोली नगरपरिषद मुख्याधिकारी यांना जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

श्रावण वद्य 12 मंगळवार, दि. 12 सप्टेंबर, 2023 रोजी भाद्रपद शुक्ल 4 मंगळवार, दि. 19 सप्टेंबर, 2023 रोजी हिंगोली जिल्हाअंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद हद्दीतील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री व साठवणूक केंद्र बंद ठेवण्यासाठी योग्य ते समुचित उपाययोजना करण्यात याव्यात.

तसेच आपल्या अखत्यारित असलेल्या परिक्षेत्रात सुरु असलेले बेकायदेशीर व अवैध कत्तलखाने आणि मांस विक्री, साठवणूक केंद्र कायम स्वरुपी बंद करण्यात यावेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय दंडाधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद हिंगोली यांना दिले आहेत.

Related posts

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान: हिंगोली तालुक्यातील उमरा गावास विशेष पुरस्कार

Gajanan Jogdand

युवा दिन : शासकीय नरसिंग महाविद्यालयात एड्स बाबत शपथ व व्याख्यानाचा कार्यक्रम

Gajanan Jogdand

लोकार्पण झालेल्या सिद्धेश्वर आरोग्य केंद्रात पुरेशा कर्मचाऱ्यांसह पाणी, वीज नाही; रुग्णांची हेळसांड

Gajanan Jogdand

Leave a Comment