मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 9 सप्टेंबर रोजी सेनगाव तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
रोही, हरीण, वानर, रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा तार कंपाउंड योजना लागू करावी, कोरडा दुष्काळ जाहीर करून पिक विमा लागू करावा.
सोयाबीनला 9 हजार तर कापसाला 12 हजार रुपये भाव देण्यात यावा, विजेचे भारनियमन रद्द करून सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऍड. शर्वरी तुपकर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष टाले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.