Marmik
Hingoli live News

बैलपोळ्यावर लंपी आजाराचे सावट! पाचही तालुक्यात प्रादुर्भाव!!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – यंदाच्या बैलपोळा सणावर लंपी स्किन आजाराचे सावट पसरले आहे. जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील गो-वंश या आजाराने ग्रस्त झाले असून सदरील आजाराच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदाचा बैलपोळा हा सण घरगुती स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यातील 72 ईपीसेंटर मध्ये गोवर्गीय पधुधन लम्पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे.

तसेच गोवर्गीय पशुधनामध्ये मर्तुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दि. 14 सप्टेंबर, 2023 रोजी बैल पोळा सणानिमित्त मोठ्या संख्येने गोवर्गीय पशुधन एकत्रित येत असल्याने जिल्ह्यातील इतर निरोगी पशुधनास लम्पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाचे बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई केली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी यांनी बैल पोळा सण हा घरगुती स्वरुपात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

Related posts

वीज वितरण कंपनीचे साहित्य चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

Santosh Awchar

संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर रंगला एकता चषक क्रिकेट सामना

Santosh Awchar

लाच घेताना खाजगी इसमासह वसमत भूमापक चतुर्भुज! जमिनीची मोजणी करण्यासाठी स्वीकारले 50 हजार रुपये

Gajanan Jogdand

Leave a Comment