मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – स्वच्छता हीच सेवा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संतोष अवचार हिंगोली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस देशभरात स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो.
यावर्षी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविला जात आहे. सदरील उपक्रम हा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्याच्या सूचना केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या असून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम “कचरामुक्त भारत” आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित केले आहे. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे.
या स्वच्छता मोहिमेला लक्ष केंद्रित करुन ग्रामीण भागातील बसस्थानक, रेल्वे स्थानके, पर्यटन स्थळे, प्र, उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदीं सार्वजनिक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात संयुक्त मोहिम राबविण्यात यावी.
स्वच्छता ही सेवा २०२३ मोहिम पंधरवाडा स्वच्छता मोहीम :- दि. १५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर २०२३ पर्यंत जिल्हा व तालुक्यातील सर्व भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. अनुषंगाने उपक्रम राबविण्यात येत आहे सर्व महत्वाच्या ठिकाणांवरील कचऱ्याची साफसफाई करावी.
तालुका व गावांमधील सर्व पारंपारिक ठिकाणावरील कचऱ्याची साफसफाई करणे.
सार्वजनिक शौचालय, कचराकुंडया, कचरा वाहतूक वाहन आदी सर्व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातुन दुरुस्ती, रंगकाम, साफसफाई, करण्यात यावीत. – गाव, शहरे आणि शहरातील विशेषत: बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटनस्थळे इत्यादीं ठिकाणी भिंत रंगविणे व कचराकुंडया ठेवण्यात याव्यात.
स्वच्छता प्रश्नमंजुषा, वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता धाव स्पर्धेचे आयोजन. – नदीकाठ/ नाला मधील व परिसरातील प्लॅस्टिक कचरा साफ करण्यासाठी साफसफाई मोहीम राबविण्यात यावी.
एकल वापराच्या प्लॅस्टिक (SUP) वस्तूंचा वापर रोखण्यासाठी जनजागृती करावी. त्याच बरोबर पर्यटनस्थळांची स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी. त्या अनुषंगाने सुका व ओला कचरा कुंड्यांवरती “हिरवा ओला, सुका, निळा” या उपशिर्षाखालील मोहिम राबविण्यात यावी.
एकल वापराच्या प्लॅस्टिक (SUP) वस्तूंचा वापर रोखण्यासाठी व पर्याय वापरण्याकरीता प्रोत्साहन देण्याकरीता सैनिक परिसरात स्वच्छता मोहिमेसह जनजागृती करावी.
शाळेमध्ये स्वच्छता मोहिम राबवून वर्तणूक बदलाबाबत उपक्रम राबविण्यात यावे. सदर उपक्रमांमध्ये कचऱ्याची उत्पत्ती त्याच ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण, कचऱ्याबाबतचे व्यवस्थापन, नियोजन आणि कचऱ्यापासून मिळणारे उत्पन्न तसेच एकल प्लॅस्टिक बाबत पर्यायी वस्तू वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यात यावे. त्याच बरोबर शक्य असेल तर शाळा/महाविद्यालयांमध्ये स्वच्छता गट स्थापन केले जाऊ शकतात.
देशाच्या स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून चालना देणारे विशेष कार्यक्रम, घेण्यात येणार आहे.
भारतीय स्वच्छता लीग स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी, युवकांच्या नेतृत्वाखालील सर्व गटांना एकत्रित करावे. सदर युवकांच्या गटांकडून स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून पर्यावरण विशेषतः टेकड्या व पर्यटन स्थळे स्वच्छ करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात गट विकास अधिकारी यांचे सनियंत्रण दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी स्वच्छ मोहिमेचे आयोजन करण्यात यावे. या बाबतची मार्गदर्शक सूचना केंद्र व राज्य शासन स्तरावरुन प्राप्त झाल्या आहेत.
सफाईमित्र सुरक्षा शिबिर :- सर्व स्वच्छता कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून एकल खिडकी कल्याण शिबिराचे दि. १७ सप्टेंबर २०२३ पासून आयोजन करावे. सदर शिबिरामध्ये सर्व विभागाच्या केंद्र शासनाच्या योजनांचा सामावेश असावा. सफाईमित्र सुरक्षा शिबिरावरील तपशीलवार मार्गदर्शक सूचना केंद्र शासन स्तरावरुन प्राप्त झाल्या.
स्वच्छता मोहीमेत नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, NCC, NSS, स्वच्छता प्रहारी, बचत गट, स्वच्छाग्रही, RWA, व्यापारी संघटना इत्यादींचा समावेश करून स्वच्छता मोहिम व्यापक स्वरुपात आयोजित करण्यात यावी.
श्रमदान :- स्वच्छता हि सेवा २०२३ अंतर्गत राबविण्यात आलेल्या श्रमदानाचे यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा.
टॅगलाइन “कचरामुक्त भारत” ही असून केंद्रीय जलशक्ती व गृहनिर्माण तसेच शहरी विकास मंत्रालय मंत्री यांच्या हस्ते दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमाद्वारे संयुक्तपणे स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा शुभारंभ करुन संवाद कार्यक्रमाद्वारे सरपंच, महापौर, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, पंचायत समिती तसेच ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतर अधिकारी, आणि विविध मंत्रालय (पर्यटन आणि संस्कृती, वन/पर्यावरण, युवक कल्याण, कॅन्टोन्मेंट बोर्ड आदी.) यांच्या सोबत संवाद साधतील.
स्वच्छता ही सेवा नमूद कालावधी दरम्यान प्रथम प्राधान्य देऊन प्रभावीपणे उपक्रम राबविण्यात यावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने व उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी केले आहे.