मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शेतकऱ्यांच्या सर्जा – राजाचा बैलपोळा हा सण हिंगोली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदाचे वातावरणात साजरा झाला. लंपी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत बैलपोळा हा सण शेतकऱ्यांनी अंगणातच साजरा केला.
हिंगोली जिल्ह्यातील गोवंशीय जनावरे लंपी स्कीन या आजाराने मोठ्या प्रमाणात आजार ग्रस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून यंदाचा बैलपोळा हा सण सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर श्रीक्षेत्र वाई गोरक्षनाथ येथील महापोळाही गावकऱ्यांनी संस्थांनी रद्द केला.
तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा हा सण सर्वत्रिकरित्या साजरा न करता आपापल्या अंगणातच साजरा केला.
अनेक शेतकऱ्यांनी गर्दी होणार नाही याची दक्षता घेत श्रीमारुती मंदिरास प्रदक्षिणा घालून आपल्या सर्जा – राजाचे औक्षण करून घेतले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजा श्रीमारुती मंदिराची प्रदक्षिणा घालण्यास वाद्य लावली होती.
वाजत गाजत सर्जा राजा ने श्री मारुती मंदिराची प्रदक्षिणा घातली. त्यानंतर घरोघरी जाऊन सर्जा – राजास नैवेद्य दाखविण्यात आले. काही ठिकाणी वगळता जिल्हाभरात बैलपोळा हा सण शेतकऱ्यांनी आपल्या अंगणातच साजरा केला.
हिंगोली येथेही बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लंपी स्किन आजार असला तरी शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजा उत्तम प्रकारे सजविले होते.
हिंगोली शहर परिसरात आणि जिल्ह्यात तुरळक ठिकाणी बैलपोळ्याच्या स्वागतासाठी वरून राजानेही हजेरी लावली होती.