Marmik
Hingoli live

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: वाई येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या वतीने 15 सप्टेंबर रोजी कळमनुरी तालुक्यातील वाई येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली 15 सप्टेंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक हिंगोली वन परिमंडळ कळमनुरी अंतर्गत वाई या गावी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2023 निमित्त स्वातंत्र्य सैनिक यांचे वारस पांडुरंग आनंदराव वाघमारे यांच्या हस्ते 75 वृक्षांची लागवड करण्यात आली.

तसेच याप्रसंगी मनुष्यहानी अंतर्गत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस नुकसान भरपाईचा धनादेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी कळमनुरी तहसीलदार सुरेखा नांदे, हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, सेनगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शेळके, वनपरिक्षेत्र अधिकारी चाटे यांच्यासह वाई ग्रामपंचायतचे सरपंच विलासराव मस्के, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, वनअधिकारी, वन कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

विशेष मोहिमेत हिंगोली पोलिसांची धडक कार्यवाही! 66 अटक वॉरंट मधील इसमांना पकडून न्यायालयात केले हजर

Gajanan Jogdand

जुन्या वादातून पप्पू चव्हाण यांच्यावर झाला गोळीबार; एक आरोपी पप्पू चव्हाण यांचा भाचा!

Gajanan Jogdand

प्रवासी व वाहतूक करणाऱ्या चालकांना मार्गदर्शन; रस्ता सुरक्षा अभियानाचा चौथा दिवस

Gajanan Jogdand

Leave a Comment