Marmik
Love हिंगोली

मराठवाडामुक्ती संग्राम दिनानिमित्त चित्र प्रदर्शनीचे आयोजन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-


हिंगोली – मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर वामनराव टाकळगव्हाणकर संकलित व नगर परिषदेच्या वतीने प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट दर्शनीचे उद्घाटन 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे सदस्य खासदार हेमंत पाटील, कळमनुरी विधानसभेचे कर्तव्यदक्ष लोकप्रियचे आमदार संतोष (दादा) बांगर, हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे, वसमतचे आमदार राजू नवघरे आदींसह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैनिक पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी जिल्हाधिकारी दिलीप कछवे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.

या चित्र प्रदर्शनीच्या मांडणीसाठी विठ्ठल सोळंके, सतीश तायडे, तानाजी मुंडे, भैयासाहेब चोपडे, दादाराव शृंगारे आदींनी मदत केली असून शहरातील गांधीवादी विचाराचे प्रचारक दादाराव शिंदे हे चरखा चालवण्याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविणार आहेत.

शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी व नागरिकांनी हे चित्र प्रदर्शन पहावे असे आवाहन हिंगोली जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर व प्राथमिक शिक्षण विभागाचे संदीप सोनटक्के यांनी केले आहे.

Related posts

जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी झाडे लावल्याशिवाय गत्यंतर नाही – कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार

Gajanan Jogdand

खबरदार ! दहा रुपयांचे नाणे नाकाराल तर… गुन्हा दाखल करण्याचा हिंगोली जिल्हा प्रशासनाचा इशारा  

Santosh Awchar

हिंगोली नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा कारभार ढेपाळला! अनेक भागांना दहा दिवसाआड पाणीपुरवठा

Gajanan Jogdand

Leave a Comment