Marmik
क्राईम

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; 3.5 तोळे सोने, 62 तोळे चांदीच्या दागिन्यांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – वसमत येथे एकाच रात्री अनेक शटरफोडून चोरी करणारे तसेच घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडून जेरबंद केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी 3.5 तोळे सोने, 62 तोळे चांदीचे दागिन्यांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आहे सदरील आरोपींनी यापूर्वी हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात शटरफोडी व घरफोडीचे अनेक गुन्हे केले असून आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील होणारी चोरी व घरपोडीच्या गुन्ह्यांना आळा घालून सदर गुन्हे करणारे आरोपी व त्यांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत आदेश देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक काम करत होते.

जुलै व ऑगस्ट 2023 मध्ये वसमत शहरात एकाच रात्री अनेक शटर फोडून चोरी झाली होती. तसेच अनेक बंद घरे फोडूनही घरफोडी झाली होती. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने बारकाईने तपास चक्रे फिरवून अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासले.

अनेक संशयित वस्त्यांवर छापेमारी करून गोपनीय माहिती काढली असता बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, वसमत येथील चोरी, घरपोडी करणारे आरोपी जोगिंदरसिंग रणजीतसिंग चव्हाण (वय 25 वर्षे, रा. रेल्वे स्टेशन परिसर वसमत), सचिन देवेंद्र घलोत (वय 30 वर्ष, रा. समीरनगर रेल्वे स्टेशन परिसर वसमत), दीपसिंग तिलपीतिया (रा. शिवनगर नांदेड) हे असून या तिघांनी मिळून वसमत शहरातील अनेक शटर फोड्या, घर फोड्या केलेल्या आहेत अशी माहिती मिळाली.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आरोपींच्या घरी जाऊन छापा मारला असता जोगिंदरसिंग चव्हाण व सचिन घलोत हे घरी मिळून आले.

त्यांना विश्वासात घेऊन सदर शटरफोडी घरफोडी बाबत विचारपूस केले असता त्यांनी वसमत शहरातील बंद घरे व शटर फोडल्याचे कबूल करून 3.5 तोळे सोन्याचे दागिने, 62 तोळे चांदीचे दागिने रोख रक्कम 2800 रुपये, चोरीसाठी वापरलेल्या दोन मोटारसायकली, चोरीसाठी वापरलेला रॉड, कात्री, बॅटरी असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून घरफोडी व एक शटरफोडीचा गुन्हा उघड झाला आहे.

नमूद आरोपीवर यापूर्वी हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात शटरफोडी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असून आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली

Related posts

कळमनुरी येथे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या सात जणांविरुद्ध कार्यवाही

Gajanan Jogdand

डोंगरकडा फाटा येथून तलवार जप्त

Santosh Awchar

बाळापुर येथील जुगार अड्ड्यावर छापा; एक लाख 16 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त, नऊ जणांविरुद्ध गुन्हा

Santosh Awchar

Leave a Comment